You are currently viewing व्यास क्रिएशन्स अंतर्गत घोषवाक्य (स्लोगन)स्पर्धेचे आयोजन

व्यास क्रिएशन्स अंतर्गत घोषवाक्य (स्लोगन)स्पर्धेचे आयोजन

 

व्यास क्रिएशन्स अंतर्गत घोषवाक्य (स्लोगन)स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट भाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी कोकणातल्या निसर्गाविषयी, ऐतिहासिक पार्श्वभूमी विषयी, इथल्या लोकसंस्कृती विषयी निवडक शब्दांमध्ये आपण एखादं हटके छानसं घोषवाक्य लिहून पाठवू शकता. उदा. वेग मी -जीवनाची हमी, अति घाई – संकटात नेई, वेगाला आवरा- जीवाला सावरा.. वगैरे.

आपले घोषवाक्य पाठवण्यासाठी युनिकोडमध्ये व्यवस्थित टाईप करून, त्यामध्ये आपले नाव, गावाचा पूर्ण पत्ता व आपल्या गटाचा स्पष्ट उल्लेख करून आमच्या इमेलवर आपले घोषवाक्य पाठवावे. 04 ऑक्टोबर 2022 या अंतिम तारखेपर्यंत पाठवावे. आपल्या घोषवाक्याचा फोटो व्यवस्थित दिसेल असा मोबाईलवर काढून 9967637255/8652233676 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा ई-मेल vyascreationsspardha@gmail.com करावा. वरीलपैकी काहीच शक्य नसल्यास आपले घोषवाक्य पोस्टाने आमच्या पत्त्यावर पाठवावे. महाराष्ट्र राज्य बक्षिसांचे स्वरूप प्रथम क्रमांकास रोख 2,222/- रुपये,
द्वितीय क्रमांकास रोख 1,111/- रुपये, तृतीय क्रमांकास रोख 555/- रुपये व उत्तेजनार्थ तीन क्रमांकास प्रत्येकी 750/- रुपयांची पुस्तके बक्षिसे स्वरूपात दिली जाणार आहेत. तर
कोकण प्रांतासाठी विशेष जिल्हानिहाय पालघर, ठाणे,
मुंबई, मुंबई (उपनगर), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रथम क्रमांक रोख 1,111/- रुपये, द्वितीय क्रमांक रोख 555/- रुपये आणि
उत्तेजनार्थ तीन बक्षिसे 555/- रुपयांची पुस्तके देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा