You are currently viewing सावंतवाडी – शिरोडा – आरोंदा वस्तीची बस  वेळेत येत नसल्याने प्रवाशांचे हाल

सावंतवाडी – शिरोडा – आरोंदा वस्तीची बस  वेळेत येत नसल्याने प्रवाशांचे हाल

एसटी नियंत्रक कक्षातून दिली जातात उद्धट उत्तरे; मनसेने एसटी प्रशासनाची भेट घेत विचारला जाब

सावंतवाडी

आरोंदा जाणारी रात्री 8 वा वस्तीची सावंतवाडी शिरोडा आरोंदा ही एसटी बस गेली महिनाभर उशिराने सुटत असल्याने कामाला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यात महिला आणि तरुणींची संख्या मोठी असून ही बस सावंतवाडी आगारातून वेळेत सुटत नसल्याने प्रवाश्याना ताटकळत राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी उशिर होत असल्याने पुढे जाण्यास त्यांना अनेक समस्याचा त्रास तसेच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असल्याने मनसेचे सावंतवाडी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार आणि पदाधिकाऱ्यांनी एसटी आगारात धडक दिली. यावेळी एसटीच्या प्रश्नावंरून अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारला.


सावंतवाडी एस टी आगारातून रात्री आठ वाजता सुटणारी सावंतवाडी- आरोंदा शिरोडा ही वस्तीची एसटी बस वेळेत फालाटावर न लागल्याने प्रवासी महिलां वं तरुणींकडून बस किती वाजता सुटेल अशी विचारणा केली असता एसटी कंट्रोलर अधिकारी वर्गाकडून उद्धट उत्तरे दिली जातात. तक्रार करून देखील वेळेत सोडण्यात न आल्याने प्रवाश्यानी मनसे शहरअध्यक्ष आशिष सुभेदार यांच्याशी संपर्क साधला. गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार यांनी पदाधिकारी यांच्यासहा आगारात धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारला. महिलांशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले. सावंतवाडी – आरोंदा जाणारी रात्रीची (मुक्कामी) ८ वाजता जाणारी एसटी बस गेली महिनाभर उशिराने सुटत असल्याने कामाला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैर सोय होत होती. यात महिला आणि तरुणीं मोठ्या संख्येने अडल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे त्यांचा सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असल्याने मनसेचा पदाधिकाऱ्यांनी एसटी आगारामध्ये जात जाब विचारला. रात्री आठ वाजता सुटणारी सावंतवाडी- आरोन्दा एसटी बस वेळेत न लागल्याने प्रवासी तरुणींनी बस किती वाजता सुटेल अशी विचारणा एसटी कंट्रोलर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याची माहिती प्रवाशांनी मनसे शहरअध्यक्ष आशिष सुभेदार यांना दिली.त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकात जात अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारला. महिलांशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून वेळ प्रसंगी त्या एसटी कंट्रोलरला समोर हजार करा व त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी लावून धरली.तसेच आगारात वस्तीची आरोदा एसटी बस उशिराने लागत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रसन्न उद्दभवत आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी एसटी प्रशासन घेणार का? असा प्रशन यावेळी मनसे कार्यकर्त्यांना उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला.
दरम्यान आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे सुट्टीवर असल्याने साहाय्यक वाहतुक निरीक्षक एस बी मुरमुरे यांनी पुनः असे होणार नाही असे आश्वास दिले. परंतु मनसे कार्यकर्ते आक्रमक होत ह्यापुढे रात्री ८ ची एसटी बस वेळेवर न सुटल्यास मनसे स्टाईलने उत्तर देणार मग आम्हाला दोषी धरू नये असे उपस्थित कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले
यावेळी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार, सचिव कौस्तुभ नाईक, संतोष भैरवकर,गिरीष उपरकर ,अमितकुमार बागवे, धनराज गोरे,निखील काणेकर, आदी मनसे पदाधिकाऱ्या सह तक्रारदार युवती उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा