You are currently viewing भंडारी समाज विकास मंडळाच्या सभागृहाचे उद्घाटन खास.मनोज कोटक यांच्या हस्ते

भंडारी समाज विकास मंडळाच्या सभागृहाचे उद्घाटन खास.मनोज कोटक यांच्या हस्ते

*रविवार ११ फेब्रुवारीला होणार उद्घाटन समारंभ*

 

मुंबई :

मुंबई भांडुप – कांजूरमार्ग परिसरातील भंडारी समाज विकास मंडळाच्या सभागृहाच्या उद्घाटनाचा समारंभ रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी खास.मनोज कोटक यांच्या शुभहस्ते होणार असून सायंकाळी ४.०० वाजता श्री.सत्यनारायण महापूजा व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

सदरचा उद्घाटन समारंभ भंडारी समाज विकास मंडळ, राम नगर, पाईप लाईन, आर.के.डी.एड.कॉलेजच्या बाजूला, भांडुप (प.), मुंबई ४०००७८ येथे होणार असून या कार्यक्रमासाठी सर्व भंडारी बंधू भगिनींनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष श्री.विनोद चव्हाण, सचिव प्रफुल्लकांत वाईरकर, खजिनदार जी.एन. बांदवलकर यांनी केले आहे. भंडारी समाज सभासद नोंदणी सुरू असून दर गुरुवार, शनिवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विवाह नोंदणी सुद्धा सुरू आहे. नोंदणी करिता बांदवलकर (फोन – ८२९१००८५५९) या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा