You are currently viewing मिस्टर युनिव्हर्सल वर्ल्ड स्पर्धेसाठी विनायक राशिनकर याची निवड

मिस्टर युनिव्हर्सल वर्ल्ड स्पर्धेसाठी विनायक राशिनकर याची निवड

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच विनायकच्या रुपाने महाराष्ट्राला भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी

दुबई येथे होणार्‍या मिस्टर युनिव्हर्सल वर्ल्ड 2022 या स्पर्धेसाठी ग्लोबल मॉडेल इंडिया या संस्थेने इचलकरंजी शहरातील विनायक राशिनकर याची निवड केली आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच विनायक याच्या रुपाने महाराष्ट्राला भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याचे प्रशिक्षक अमर सोनवणे आणि मयुरेश अभ्यंकर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले.

इचलकरंजी शहराचा सुपूञ असलेल्या विनायक राशिनकर याने आतापर्यंत अनेक फॅशन शो आणि विविध कंपन्यांसाठी मॉडेलिंग केले आहे. त्याला अनेक फॅशन शोमध्ये बेस्ट फोटोजनिक, बेस्ट परफॉर्मर असे पुरस्कारही मिळाले आहेत. आत्आ कमर्शियल फोटोशूटसाठीही त्याची निवड झाली आहे. विनायक हा व्यवसाय सांभाळण्याबरोबर स्वतःचा छंदही जोपासत आहे. विनायक सर्व स्पर्धेत यशस्वी होण्यात एकत्र कुटुंब पद्धतीचा मोलाचा वाटा असून भविष्यातही त्याच्या पाठीशी सर्व कुटुंबीय खंबीरपणे उभे राहणार असल्याचे दीपक राशिनकर यांनी सांगितले. विनायक हा मिस्टर इंडिया 2022 चा विनर असून त्याची दुबई येथे होणार्‍या मिस्टर युनिव्हर्सल वर्ल्ड 2022 स्पर्धेसाठी ग्लोबल मॉडेल इंडिया या कंपनीने निवड केली आहे. विनायक याच्या रुपाने प्रथमच महाराष्ट्राला भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. ऑक्टोंबर महिन्यात दुबई येथे होणार्‍या या स्पर्धेत 20 हून अधिक देशांचा सहभाग असणार असल्याचे प्रशिक्षक अमर सोनवणे यांनी सांगितले. मयुरेश अभ्यंकर यांनी फॅशन शो म्हणजे केवळ तोकडी कपडे घालून अंग प्रदर्शन करणे नव्हे. यामध्येही करिअर करण्याची उत्तम संधी असल्याचे सांगितलं. यावेळी विनायक राशिनकर याने या प्रवासात सर्व इचलकरंजीकर आणि पूर्ण भारत माझ्या पाठीशी उभा राहील याची मला खात्री असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा