You are currently viewing कोणत्या बांधकाम कामगाराला घर मिळणार
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

कोणत्या बांधकाम कामगाराला घर मिळणार

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

**कोणत्या बांधकाम कामगाराला घर मिळणार**

‌ समाजातील वंचित आणि अडाणी गरजू व्यसनी समजला जाणारा घटक म्हणजे मिळेल ते काम मिळेल ती मजूरी करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा कसाबसा अर्धपोटी उपाशी राहून उदरनिर्वाह करणारा . आर्थिक दुर्बल. शैक्षणिक दुर्बल. सामाजिक दुर्बल. वैद्यकीय दुर्बल आणि. वैयक्तिक दुर्बल. असा घटक म्हणजे बांधकाम कामगार होय.
आपल्यातल्या कोणालाही याची जाणीव आणि कणव नव्हती पण आपणं ज्या इंग्रजाना आपल्याला गुलाम केल अस म्हणतो त्यांनीच या बांधकाम व असंघटित क्षेत्रातील लोकांच्या साठी एप्रिल १०२१ मध्ये मुंबई येथे पहिले कामगार कार्यालय स्थापन केले . त्यावेळचे लाॅरड लाईड यांनी हे काम आपल्या निदर्शनात पूर्ण केले. त्यावेळी संपूर्ण भारतात एकच कामगार कार्यालय होते. त्यावेळेपासून कार्यालयाने आजतागायत ७७ वर्ष यशस्वीरीत्या कामकाज केले आहे. १९२६ साली या कार्यालयाचे नाव बदलून संचालक. माहिती व कामगार इंनटिलिजनस असे ठेवण्यात आले. १९३९ साली कामगार कार्यालये विभाजन करण्यात आले. १९४७ साली मुंबई कामगार कार्यालयाची पुनर्रचना करण्यात आली. १९५३ साली कामगार कल्याण मंडळांची स्थापना होईपर्यंत हे कामकाज कामगार कल्याण यांच्यामार्फत कामगार आयुक्त पाहत होते. १९७९ साली कामगार कार्यालयाची फेररचना करुन तीन विभाग करण्यात आले. विविध कामगार कायदे करण्यात आहे.
कामगार आयुक्त यांचेकडून एकूण २४ कामगार कायदे तयार करण्यात आले. त्यामधील १९ कायदे केंद्रीय कायदे व उर्वरित ६ कामगार कायदे हे राज्यसरकार यांच्या अखरितयाखाली आहेत.
कामगार नोंदणी साठी गाव गल्ली वस्ती तालुका शहर राज्य देश यामधून विविध संघटना सेवा भावी संस्था युनियन राजकीय सामाजिक संघटना याची निर्मिती करण्यात आली त्यांना शासकीय नोंदणी करुन कामगारांना संबोधन प्रबोधन कामगार योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी शासनाने रजिस्ट्रेशन दिले पण झाल उलट आज प्रत्येक संघटना सेवाभावी संस्था युनियन सामाजिक संघटना राजकीय संघटना यांनी कामगारांना विविध योजना मिळवून देतो यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या लाभातील आपला आर्थिक वाटा अगोदरच निश्चित केला आहे. जागोजागी कामगार नोंदणी करणारे बाजार हे कामगार मेळावे या नावाने भरले जात आहेत. आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती त्या त्या जिल्ह्यातील सहहयक कामगार आयुक्त अधिकारी कर्मचारी आपली हजेरी लावत आहेत. म्हंजे अशा भ्रष्ट संघटना सेवा भावी संस्था युनियन राजकीय संघटना सामाजिक संघटना यानी सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून लुटारू टोळी उभी केली आहे.
आज बोगस कामगार नोंदणी ला उत आला आहे. म्हंजे यासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी. संघटना. सेवाभावी संस्था युनियन विविध पदाधिकारी एजंट जबाबदार नाहीत तर यासाठी कारणीभूत आणि दोषी आहेत ते म्हणजे बांधकाम कामगार यांना नोंदणी प्रमाणपत्र देणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हेच आहेत कारणं बांधकाम कामगार आहे हे सिद्ध कोणी केलं इंजिनिअर यांनीच म्हंजे कारवाई झाली पाहिजे ती म्हणजे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांच्यावर आजच शासनाने कामगार मंत्री यांनी चौकशी आदेश आयोग समिती नेमण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.
‌ आज शासनाने आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून व कामगार मंत्री यांनी सांगली जिल्ह्यातील ६५ हजार बांधकाम कामगार यांना घर देण्यासाठी सर्वे करण्याचे आदेश दिले कां नाही मला माहीत नाही तसा शासन निर्णय नाही कारणं आज २०१३ साली ही योजना बांधकाम कामगार यांना घर दुरुस्ती साठी १ लाख ५० हजार आणि नविन घर बांधण्यासाठी २५०००० ही घोषणा करण्यात आली होती आजपर्यंत एकाही बांधकाम कामगार याला मंडळाकडून घरकुल लाभ झालेला नाही . मग आता जर बांधकाम कामगार यांना घरकुलाचे वाटप झाले तर खरोखरच कामगार अगोदर शोधण्याची गरज आहे. म्हणजे आज पुरुष कामगार यांच्यापेक्षा महिलांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी जास्त आहे आणि वाईट गोष्टी म्हणजे एकही महिला कुठ कामावर काम करताना दिसत नाही त्यांना घरकुल मिळणार कां ?? आणि मिळाले तर कोणत्या निकषांवर मिळणार हे जाहीर करा. वडापाव विक्री करणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. रिक्षाचालक. वाहनं चालक. नोकरी करणारे.‌किराणा दुकानांत काम करणारे. शेतात जाणारे. घरकाम करणार्या महिला. शुमारट. बेकरी. चायनीज. दाबेली. पानपट्टी वाले. शाळा काॅलेज मध्ये शिकणारी मुले. एम आय डी कामगार. कारखाने. पतसंस्था. बॅंका. इतर सोसायट्या येथे काम करणारे कर्मचारी. अशा विविध ठिकाणी काम करणारे लोक यांचा बांधकामाशी कोणताही आणि कसलाही संबंध नाही . पण यांचीच नोंदणी आज जिल्ह्यात सर्वात जास्त झाली आहे. मग शासन या कामगारांना घरकुल देणार कां ?? एका घरातील पाच पाच लोकानी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे मग त्यांना पाच घर मिळणार काय ?? ज्या बांधकाम कामगारांना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचेकडून प्रधानमंत्री आवास. इंदिरा आवास. रमाई आवास वाल्मिकी आवास. आदिवासी आवास. यातून आगोदर घर मिळालं आहे त्यांना आत्ता मंडळाकडून घर मिळणार कां. शासकीय सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी हे ६५ हजार कामगार यांच्या दारात सर्वे करायला जाणार कां ?? कारण ‌ कार्यालयातून ज्यांना काम होत नाही ते बाहेर जाऊन सर्वे करणार का दारु मटण पार्ट्या करणार कोड आहे ?? संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय संघटना सामाजिक संघटना यांनी अशा बोगस बांधकाम कामगार यांना घर मिळवून देण्यासाठी सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांचा किती आर्थिक वाटा असणार आहे ??
‌वरिल लोकांना घरकुल जर शासन देणार असेल तर ज्या इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांनी ज्यांना बांधकाम कामगार नोंदणीसाठी प्रमाणपत्र दिले आहे त्यांनी किती पैसे घेतलें यांची सुध्दा चौकशी होण गरजेच आहे. त्यांच्यावर त्यांनी ज्या कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे त्याचे ९० दिवसांचे हजेरी पत्रक. ९० दिवसांचे पगार पत्रक. मग ते चेक द्वारे असेलतर बॅंक डिटेल्स. आणि त्या कामगाराने ज्या कामांवर कामगार म्हणून काम केले आहे त्या बांधकाम मालकांचे कामगार होता आणि काम करत होता असे हमीपत्र मागविण्यात यावे. आणि मगच तो कामगार आहेत हे ठरविण्यात यावे. असा जर सर्वे झाला तर ६५ हजार आज आहेत सर्वे झाल्यावर ३५ हजार राहणार आणि ते खरे कामगार असणारं आहेत. कामगाराच भल झाल पाहिजे पण जो उन्हात पाऊसात थंडीत सिमेट मध्ये दिवसभर राबतो. ज्याच्या हाताला पायाला सिमेंटन होल पडली आहेत ज्यांचे हात पाय सिमेंट न पांढरे झाले आहेत असा कोणताही व्यक्ती आज बांधकाम कामगार यांच्यासाठी असणारे विविध लाभ घेण्यासाठी आलेला दिसत नाही. अशी लोक लाभ घेण्यासाठी येतात की इस्त्री कपडे बुट हातात वीस ते पंचवीस हजारांचा मोबाईल. सुरक्षा संच नेण्यासाठी कमीत कमी दहा लाखांची गाडी घेऊन येणारा बांधकाम कामगार असू शकतो कां ??
बांधकाम कामगार योजना 2022 चा लाभ हा नवीन इमारत बांधण्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंत जे जे मजूर त्यामध्ये काम करतात, अश्या सर्व कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. ते कामगार खालील प्रमाणे असतील.
खुदाई कामगार
फर्णिचर, सुतार कामगार
गवंडी कामगार
फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)
पेंटींग कामगार
सेंट्रींग कामगार
वेल्डिंग
फॉब्रीकेटर्स
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना(pm fme)2021-2025 संपूर्ण माहिती
बांधकाम कामगार योजना फायदे
नोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालील योजनांचा लाभ घेता येईल.
** नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा ५,०००/- रुपये दिले जातील.
** नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास ३०,०००/- रुपये दिले जातील.
‌‌ ** बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत
नैसर्गिक प्रसुतीसाठी – १५,०००/-
शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी – २०,०००/-
** बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी –
१ ली ते ७ वी पर्यंत प्रतीवर्षी २,५००/- रुपये दिले जातील.
८ वी ते १० वी पर्यंत प्रतीवर्षी ५,०००/-रुपये दिले जातील.
११ वी १२ वी पर्यंत प्रतीवर्षी १०,०००/- रुपये दिले जातील.
पदविका अभ्यासक्रम साठी – २०,०००/-रुपये दिले जातील.
अभियांत्रिकी पदवीसाठी – ६०,०००/-
वैद्यकीय पदवीसाठी – १,००,०००
MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परीपूर्ती केली जाईल.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२१ उद्दिष्ट्ये,पात्रता,लाभ, कागदपत्रे, फार्म PDF
‌‌ ** कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १,००,०००/- मुदत बंद ठेव.
बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी – १,००,०००/- अर्थसाहाय्य
बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी -६,०००/- अर्थसाहाय्य
बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास – २,००,०००/- अर्थसाहाय्य
बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी -१०,०००/- अर्थसाहाय्य
बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे -२४,०००/- अर्थसाहाय्य
नोंदणीकृत कामगाराचा कामावर जर मूत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला – ५,००,०००/- अर्थसाहाय्य
घर बांधणी साठी-४,५०,०००/- अर्थसहाय्य (केंद्र शासन- २,००००० /- कल्याणकारी मंडळ- २,५०,०००/-) अर्थसाहाय्य
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू केली जाईल आणि त्याचा लाभ घेता येईल
बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
नोंदणी अर्ज
पासपोर्ट आकारातील २ फोटो
रेशन कार्ड झेरॉक्स
आधार किंवा मतदान कार्ड
बँक पासबुक झेरॉक्स
ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
नियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )
महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
[ ५१००० रुपये अनुदान देण्यात येईल.
जर बांधकाम कामगाराचा अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर अशावेळी त्याचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च महाराष्ट्र कामगार मंडळ करणार आहे.
काम करत असतांना बांधकाम कामगारांचा हात किंवा पाय निकामी झाला तर त्या बांधकाम कामगारास अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
वरील प्रमाणे या तीन नवीन योजनांचा लाभ आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे
घर खरोखरच कामगार असेल त्यालाच मिळावे यासाठी जे अधिकारी व कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत त्यांच्यासोबत एक नागरिक कि ज्याचा राजकीय बेस नाही. संघटना बेस नाही. असा सर्वसामान्य व्यक्ती असणे गरजेचे आहे अन्यथा या सर्वेक्षणाची जबाबदारी एखादी नोडल एजन्सी नेमून देण्यात यावी सर्वेक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत एकही संघटना कार्यकर्ता नसेल याची खबरदारी घेण्यात यावी.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

 

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + seventeen =