*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी श्री चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केलेलं कादंबरीचे रसग्रहण*
*कादंबरी: अमृताहुनी गोड*
✒️लेखक: श्री कृष्णकांत चेके
अम्रुताहुनि गोड म्हटलं कि आपसुकच पुढची ओळ मनात रुंजी घालत असते ती म्हणजे *नाम तुझे देवा.
संत नामदेवांच्या या अभंगाला सुप्रसिध्द हार्मौनियमवादक कै.बाळ माटे यांनी संगीत दिलेलं आणि स्व.माणिकताई वर्मानी गायलेलं आहे. हा अभंग महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला,सर्वतोमुखी झालेला आणि रसिकांच्या घराघरात माणिकताईनी पोहचवलेला.
अम्रुताहुनि गोड हे शीर्षक बघुनच संत नामदेवांच्या आयुष्याचा जीवनपट श्री चेके सरांनी कादंबरीच्या माध्यमातून वाचकांसमोर उलगडून दाखवलेला. त्यासाठी मनःपुर्वक धन्यवाद.
संत हेच भूमीवर।चालते बोलते परमेश्वर।
वैराग्याचे सागर। दाते मोक्षपदांचे।।
असा संत महिमा आहे.
ज्या काळात धर्माची सर्व सुत्र एका विशिष्ठ वर्णाच्या हाती होती त्या काळात बहुजन समाज खऱ्या ज्ञानापासून वंचित झालेला होता.
लोपले ज्ञान जगी।हित नेणती कोणी
अवतार पांडुरंगे। नाव ठेविले ज्ञानी
अशा कार्यासाठी माऊलींचा अवतार झाला. समाज जीवनामध्ये ज्ञानेश्वर माऊली,नामदेव,एकनाथ,तुकाराम,आणि संत रामदास स्वामी ह्या पाच संताच कार्य अद्वितीय असच आहे. हे पाच संत म्हणजे महाराष्ट्र जीवनाचे पंचप्राणच आहेत.
अम्रुताहुनि गोड या कादंबरी मध्ये नामदेव महाराजांच्या आयुष्याचे अनेक पैलू लेखकांनी उलगडून दाखवलेले आहेत.संत नामदेव महाराजांच्या कर्तुत्वाचेआगळेच आणि दैदीप्यमान असे पैलू लेखकांनी लेखनीतून मांडलेले आहेत.
त्या काळात महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्रा बाहेर जाऊन भागवत धर्माचा प्रसार ,गुजराथ, राजस्थान,मध्यप्रदेश,पंजाब इ.प्रांतामध्ये संत नामदेव महाराजानी केला होता. भागवत धर्माची धवल पताका सर्वत्र फडकविली आणि आजच्या आंतरभारतीच कार्यच जणू नामदेव महाराजांनी त्याकाळामध्यै केलेल होत
१३व्या शतकात नामदेव महाराजांच हे कार्य सर्वदूर पसरलेल होत.
नामदेव महाराज विठोबाचे परम भक्त होते. विठ्ठल त्यांचेशी संवाद साधत असत. तेव्हाच आग्रह करुन नैवेद्य खाऊ घातलेला.
विठोबाच्या चरणी कल्पतरुची छाया उपभोगणारे आणि पंढरीरायाचे प्रेमभंडारी झालेले संत नामदेव महाराज,त्यांच सारासार जीवनच विठ्ठलमय झालेल होत त्यामुळे त्यांचे हातून घडणारी प्रत्येक क्रुती ही विठ्ठलासाठी आणि विठ्ठलासाठीच होती. ध्यानी ,मनी,स्वप्नी,यत्र तत्र सर्वत्र विठ्ठल,विठ्ठल विठ्ठल असच म्हणनारे व माननारे संत नामदेव महाराज असं म्हणतात कि माझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठलच असावा अशी अनुभुती कादंबरी वाचताना सहजच येती आहै.
नामदेवाचा अहंकार मुक्ताईनं हरण केलेला व नामदेवांना गुरु करावा लागला. ज्ञानेश्वर,सोपान,मुक्ताबाई, व नंतर निव्रुत्तीनाथ यांचे समाधीचे वेळी नामदेव हजर होतेच. सर्व संतांच्या समाधीचं वर्णन लेखकानी भावपुर्ण लेखन शैलीत केलेल आणि समाधी सोहळा वाचताना अश्रुपात झाल्याशिवाय राहत नाही.
चालला समाधीचा सोहळा
दाटला हो भक्तजनांचा गळा
असचं समाधी सोहळ्याच वर्णन केलेल आहे.
नामदेवांच्या आयुष्यात वामदेव सारखा द्वेष्टा आल्यामुळे पदोपदी छल कपट करुन नामदेवाला कायम पाण्यात पाहू लागले. वासुदेव शास्त्रींच्या कोर्टामध्यै नामदेवाला अपमानीत करण्यात आलेलं तात्पर्य राजकारण त्याही काळात होतं.
जी संतमंडळी उच्चवर्णीय नव्हती त्यांना देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश नसायचा. ही संतमंडळी म्हणजे गाभाऱ्या बाहेरची निरांजनं होत.
अशा संत श्रेष्ठ नामदेवांना साष्टांग प्रणिपात करुन माझ कांदंबरी विषयावरच मत प्रदर्शित करुन थांबतो.
श्री चेके सरांनी संत वाङमयाचा अतिशय खोलवर अभ्यास केलेला दिसतो.त्यांच्या लेखन कार्याला शुभेच्छा
आपला स्नेही
चंद्रशेखर द. धर्माधिकारी
वारजे,पुणे