You are currently viewing कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या मटका,जुगार,दारू विक्री आदी अवैध व्यवसायांना आळा घाला..

कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या मटका,जुगार,दारू विक्री आदी अवैध व्यवसायांना आळा घाला..

कुडाळ तालुका मनसेचे पोलीस निरीक्षकांंना निवेदन

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील अवैध व्यवसायांवर आळा बसवण्यासाठी कठोर कारवाई संबंधी मनसेच्या शिष्टमंडळाने आज पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले.सदर निवेदनानुसार कुडाळ तालुक्यात जुगार मटका व गावठीसह गोवा बनावटीची दारू विकणे आधी अवैध व्यवसाय अलीकडील काळात पाहू लागले आहेत गावोगावी अनैतिक धंदे यांना जणू झालेला दिसून येत आहे अशी परिस्थिती आहे.या अवैध धंद्यांना आळा बसवण्यास पोलिस प्रशासन नक्कीच सक्षम आहे परंतु त्यासाठी ठाम निर्धार व प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. या आधी पोलिस प्रशासनाने या बाबतीत अनेक कारवाया केलेले आहेत मात्र या अवैध धंद्यांवर कायमचा आळा बसत नाही ही खरी शोकांतिका आहे.त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्या गावगुंडांचा जणू माफियाराज बोकाळले आहे असे चित्र कुडाळ तालुक्यात दिसून येत आहे. या बेकायदेशीर व्यवसाय बाबत सामान्य माणसाची विरोधात बोलण्याची हिंमत होत नाही त्यामुळे संबंधित व्यावसायिक कुणाचीही तमा न बाळगता शासनाचा अगदी गृहीत धरून राजरोसपणे काळे धंदे करीत आहेत.अलीकडील सावंतवाडी आंबोली येथील महिला घातपात प्रकरण यासह जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणे आहेत जागून या मागील प्रमुख कारण अवैध धंदे, नशा, आदी घटक आहेत. शिवाय संबंधित गुन्हेगारही याच व्यवसायांची निगडित आहेत. एकूणच तालुक्यातील तरुण पिढी वाम मार्गाला लागून बरबाद होत आहे असे चित्र आहे. त्यामुळे अनैतिक व्यवसायांचे मूळ उघडून काढणे ही काळाची गरज बनली आहे. तरी कुडाळ तालुक्यातील अवैध व्यवसायांवर कारवाईची धडक धडक मोहीम हाती घेऊन या व्यवसायांवर कायमस्वरूपी आळा बसवावा. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गावोगावचे सर्व महाराष्ट्र सैनिक या अवैध धंद्यांचे प्रकार व ठिकाणी व व्यवसायिक यासंबंधीची सविस्तर माहिती पोलीस प्रशासनाला पुरवून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवतील व आपणास लागणारी सर्वतोपरी मदत व सहकार्य करतील असे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,तालुका सचिव राजेश टंगसाळी, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे,कुडाळ शहर उपाध्यक्ष वैभव परब,शहर सचिव रमाकांत नाईक, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 19 =