You are currently viewing दाभोली तेली वाडी येथील दुचाकी गाड्यांचे अज्ञातांकडून नुकसान

दाभोली तेली वाडी येथील दुचाकी गाड्यांचे अज्ञातांकडून नुकसान

स्थानिकांची वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार..

वेंगुर्ले:

वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली तेली वाडी येथे रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या दुचाकी गाड्यांचे अज्ञाताने सुरीने सीट फाडून, गाड्यांवर क्रश पाडून आणि पेट्रोल काढून नुकसान केले आहे. याबाबत तेथील नागरिकांनी वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे.

दाभोली ग्रामपंचायत कार्यालया शेजारी तेली वाडीतील ग्रामस्थांना आपल्या घरापर्यंत गाड्या नेण्यासाठी रस्ता नसल्याने या वाडीतील ग्रामस्थ आपल्या गाड्या रस्त्याच्या बाजूला सुरक्षित रित्या उभ्या करून ठेवतात .कोणाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून प्लास्टिक ओढून पार्किंग प्रमाणे व्यवस्था त्यांनी केली आहे. अनेक दिवसांपासून इथे गाड्या लावल्या जातात मात्र ,मंगळवारी रात्री कुणीतरी अज्ञाताने या ठिकाणी लावलेल्या सर्व गाड्यांचे धारदार चाकूच्या सहाय्याने नुकसान केले आहे. तरी संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी वेंगुर्ले पोलिसांकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 11 =