*आर्टिक प्रॉडक्शन अँड टीम या युट्युब चॅनलवर प्रदर्शीत*
सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांचे अनेक युट्युब चॅनेल खूप जोमाने काम करत आहेत. अंगीभूत कलांचे प्रदर्शन,दैनंदिन जीवनातील छोटे मोठे व्हिडीओ तसेच शॉर्टफिल्म च्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले जात आहे. अशाच देवगड मधील आर्टिक प्रॉडक्शन अँड टीम या युट्युब चॅनलने सिंधुदुर्गात पहिल्यांदाच “आदिती द मिस्ट्री”ही सस्पेन्स हॉरर शॉर्ट फिल्म नुकतीच प्रदर्शीत केली आहे. ही शॉर्ट फिल्म हॉरर व पुढे काय होणार याबाबत उत्सुकता वाटणारी शॉर्ट फिल्म असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
या शॉर्ट फिल्मचे निर्माता देवगड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण हे आहेत , लेखक अभिजित शिक्रे- पुणे,तर दिग्दर्शन कणकवली तालुक्यातील आशिये गावचे सुपुत्र श्रीपाद बाणे यांनी केले आहे. तसेच या शॉर्ट फिल्मचे सिनेमाटोग्राफर / डीओपी/एडिटर कु .मृणाल चव्हाण यांनी केले आहे. आर्ट डिरेक्शन कु. दिव्यानी चव्हाण यांनी केले आहे.
शॉर्ट फिल्म मध्ये प्रमुख कलाकार म्हणून श्रीपाद बाणे, दिव्यानी चव्हान, चैत्राली काणेकर ,कृतिका भाकरे, सायली शिवलकर,यामिनी भाकरे यांनी उत्तम रित्या काम केले आहे. विशेष सहाय्य देवगड तालुक्यात वाडा गावातील (जानकी कुंज हाऊस ) मधु केसरकर,विकास केसरकर,प्राजक्ता परब,राजेंद्र परब, सागर परब,सानिका परब यांनी केले.सिंधुदुर्ग मधील कलाकारांनी सादर केलेल्या कलेचा आंनद घेऊन शॉर्ट फिल्मला जिल्हा वासियांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आर्टिक प्रॉडक्शन अँड टीम व शॉर्ट फिल्म मधील कलाकारांनी केले आहे.