वागदे येथे अपघातात मृत्यू झालेल्या नरडवे येथील प्रशांत सावंत यांच्या कुटुंबाला आमदार नितेश राणे यांनी 10 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार त्यांच्या पत्नी श्रीमती सुचिता प्रशांत सावंत व मुलगा प्रथमेश प्रशांत सावंत यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जि. प. सदस्य सुरेश ढवळ, ॲड. प्रसन्ना सावंत, राकेश परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.