You are currently viewing विज्ञान ही दुधारी तलवार, चांगले घ्या वाईट ते सोडून द्या – विद्याधर सुतार

विज्ञान ही दुधारी तलवार, चांगले घ्या वाईट ते सोडून द्या – विद्याधर सुतार

वेंगुर्लेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न…

वेंगुर्ला

आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. मात्र, विज्ञान ही दुधारी तलवार असल्याने त्यातील चांगले ते घेणे व वाईट सोडून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी केले.

जिल्हा परिषद सिधुदुर्ग व वेंगुर्ला पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने ४९वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शहरातील मदर तेरेसा स्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सोमवारी विद्याधर सुतार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी भाक्रे, मदर तेरेसा स्कूलचे फादर अॅन्थोनी डिसोजा, त्रिबक आजगांवकर, केंद्रप्रमुख आव्हाड, राजू वजराटकर, सीताराम लांबर, केंद्रप्रमुख चव्हाण, गटसाधन केंद्राचे विनोद सावंत आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन प्रतिकृतींचे उद्घाटन मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते झाले. सहावी ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन गटात एकूण १५८ विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 19 =