You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी व्यवसाय अधिकृत करण्यासाठी नौका सर्वे प्रक्रिया पूर्ण करावी : श्री विष्णू मोंडकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी व्यवसाय अधिकृत करण्यासाठी नौका सर्वे प्रक्रिया पूर्ण करावी : श्री विष्णू मोंडकर

मालवण :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांना संघटित करून जलक्रीडा व्यवसायात सुसूत्रता येण्यासाठी महासंघाचे प्रयत्न चालू असून जलक्रीडा व्यवसाय करण्यास परवानगी मिळण्यासाठी पर्यटन संचालनालय नवी मुंबई यांच्या कडे परवानगीसाठी ज्या व्यावसायिकांनी प्रस्ताव सादर केले आहेत त्यासाठी महासंघामार्फत प्रयत्न चालू आहेत. त्याचाच एक महत्वपूर्ण प्रक्रियेचा भाग नौका सर्वे प्रक्रिया असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे जलक्रीडा व्यावसायिक प्रवासी व नौका विहार, स्कुबा डायव्हिंग, पॅरॅसिलींग, वॉटरस्पोट व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी सेवा देतात अश्या व्यावसायिकांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून होणाऱ्या नौका सर्वे प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. गेले सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नौका सर्वे साठी शासकीय फी जमा करून देखील नौका सर्वे साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिकारी उपलब्ध होत नसल्यामुळे जलक्रीडा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यासंबंधी पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे प्रयत्न चालू होते. या पाठपुराव्यास महासंघास यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या वतीने दिनांक १४ व १५ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांच्या नौका सर्वे साठी अधिकारी उपस्थित राहून नौका सर्वे प्रकिया पूर्ण करणार आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की जलक्रीडा व्यवसाय अधिकृत करण्यासाठी नौका सर्वे प्रक्रिया पूर्ण करावी अशी माहिती श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा