You are currently viewing प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत तुळस येथील साटम कुटुंबाला २ लाखांचा लाभ

प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत तुळस येथील साटम कुटुंबाला २ लाखांचा लाभ

वेंगुर्ला

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवणज्योति विमा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होडावडा शाखेत तुळस येथील ममता महेश साटम यांच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले. याबाबतचे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीमती साटम यांना सुपूर्द करण्यात आले.
तुळस पांडेपरबवाडी येथील महेश वसंत साटम यांचे ९ जून २०२१ रोजी अपघाती निधन झाले होते. कै साटम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होडावडा शाखेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवणज्योति विमा योजने अंतर्गत विमा उतरवला होता. यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारस म्हणून त्यांची पत्नी ममता साटम यांना विम्याची २ लाख रुपये रक्कम यांच्या खात्यात जमा करण्यात आली. आणि आज याबाबतचे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते तिला सुपूर्द करण्यात आले. यावेळी होडावडा शाखा व्यवस्थापक सुनील जाधव व बँक कर्मचारी आर्ची कांबळी, राघवी डीचोलकर, प्रितम ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा