You are currently viewing साडेसात वर्षे सत्ताधारी पक्षाचा आमदार असून देखील मालवण येथील भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज विकासापासून वंचित

साडेसात वर्षे सत्ताधारी पक्षाचा आमदार असून देखील मालवण येथील भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज विकासापासून वंचित

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांचा आमदार वैभव नाईक यांच्यावर घणाघात

भटके विमुक्त समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे करणार पाठपुरावा जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी दिली माहिती.

मालवण-

मालवण तालुक्यात भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज मोठ्या प्रमाणात आहे.तालुक्यातील धनगर वस्त्या अजून देखील मुख्य प्रवाहात आलेल्या नाहीत.अजून वाडीवर जायला जनतेला पायपीट करावी लागते. स्थानिक आमदार वैभव नाईक सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून कार्यरत होते तरी देखील या तालुक्यातील भटके विमुक्त समाजाच्या वाडीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करू शकले नाही ही शोकांतिका आहे. मालवण तालुक्यातील भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज बांधवांनी या गोष्टीचे आत्मपरीक्षण करून 2024 ला परिवर्तन घडवून आणणे काळजी गरज आहे. आणि आम्हाला खात्री आहे 2024 ला नक्की परिवर्तन होणार.राज्यात आत्ता शिंदे साहेब व फडणवीस साहेब यांच्या विचारांची सत्ता आहे.जिल्ह्यात मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, आमदार नितेश राणे साहेब, माजी खासदार नीलेश राणे साहेब यांसारखे नेतृत्व आमच्या पाठीशी आहेत.त्यामुळे मालवण तालुका भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज बांधवांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. मालवण तालुका भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बाळा गोसावी तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज बांधवांच्या वाडीवस्तीवर पोहोचवणार विकास कामे त्यामुळे 2024 ला कुडाळ मालवण विधानसभेवर कमळ फुलणार नवलराज काळे यांनी व्यक्त केला विश्वास. भाजप भटके विमुक्त आघाडीची मालवण तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी केली जाहीर. तालुक्यातील वाडी वस्तीच्या विकास कामांचा घेतला आढावा.रस्ते कामे, समाज बांधवांचे जातीचे दाखले व इतर वैयक्तिक बाबी समजावून घेऊन समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आमदार नितेश राणे साहेब व माजी खासदार निलेश राणे साहेब यांच्याकडे करणार पाठपुरावा जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी दिली माहिती.
यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, मालवण तालुका अध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी,मालवण शहर अध्यक्ष अशोक मोहिते,जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी चव्हाण,तालुका उपाध्यक्ष सुनील वरक,राजू मानवर,अमित गोसावी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा