You are currently viewing आपदग्रस्तांना फोंडावासियांकडून मदत

आपदग्रस्तांना फोंडावासियांकडून मदत

अजित नाडकर्णी यांचा मदतीचा हात

फोंडाघाट

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपदग्रस्ताना अजित नाडकर्णी यांनी मदतीचा हात दिला आहे. आज फोंडाघाट मधुन चार ट्रक सामान रवाना झाले. यावेळी जि.प.सदस्य संजय आग्रे, व्यापारी, देणगीदार, शिवप्रतिष्ठानचे सदस्य ट्रक चालक मालक संघाचे सर्व कार्यकर्ते, लोकप्रतीनिधी आणि आश्रयदाते उपस्थित होते. आणखी मदत लागली तरी फोंडावासिय चिपळूण आणि कोकणवासीयांच्या मदतीला जाणार आहेत.

दरम्यान, बांदावासीयांनाही मदत करणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी स्पष्ट केले. दोन दिवसात बांदावासीयांना मदत करणार असल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा