सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सन्माननीय निरिक्षक ॲड. गुलाबराव घोरपडे यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे शेतक-यांच्या विरोधात जो केंद्र सरकारने काळा कायदा केला आहे तो कायदा रद्द करण्यासाठी शेतक-यांच्या सह्यांची मोहीम सूरू करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळा गावडे, माजी अध्यक्ष व प्रांतिक सदस्य विकासभाई सावंत, उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, सरचिटणीस महेंद्र सावंत, सुशिल राणे, सचिव महेश अंधारी, रविंद्र म्हापसेकर, महिला राज्य कार्यकारिणी सदस्य विभावरी सुकी, कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, वैभववाडी पंचायत समिती माजी सभापती मीनाताई बोडके, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, युवक काँग्रेस माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, पल्लवी तारी, सरदार ताजर, कणकवली युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष निलेश तेली, अशोक राणे इत्यादी उपस्थित होते.