कणकवली
कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी कणकवली आराखड्याबाबत आपले अज्ञान प्रगट करू नये असे मनसे जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सल्ला दिला आहे.
सन 1999 मध्ये कणकवली शहराचा विकास आराखडा शासनाच्या नगररचनाकारांकडून तयार करून त्यावर हरकती नोंदविण्याकरिता जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. या हरकती नोंदविण्याकरता जिल्हा परिषदे कडील कमिटी ठिकठिकाणी फिरून हरकती नोंदवून घेतल्या होत्या. त्यातील डी.सी. नियमांप्रमाणे जी आरक्षणे काढता आली ती वगळता व डी.सी. नियमातील लोकसंख्येच्या निकषांप्रमाणे वॉर्डावॉर्डात व शहरात जी आरक्षणे ठेवावी लागतात ती आरक्षणे ठेवलेली होती व जी वगळणे शक्य होते ते नगररचनाकारांनी वगळली होती. त्या जिल्हा परिषद कमिटी मध्ये सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राजन तेली होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली या डी.पी. प्लॅनला जि प मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शासनाने मंजुरी दिली ती सुद्धा बंडू हर्णे यांच्या पक्षाचे नेते व तत्कालीन या भागाचे आमदार व सध्याचे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या सहीने कणकवलीच्या डीपी प्लॅनला शासनाने मंजुरी दिली होती हे बंडू हर्णे जनतेला सांगायला सोयीस्कर रित्या विसरले.
बंडू हर्णे हे स्वतःला आरक्षणातील नियमांचे व बांधकामाच्या अभ्यासू कीडा समजतात पण त्यांनी नवीन आलेल्या डेव्हलपमेंट प्लांट पासून पहावा. शहराला व प्रत्येक वॉर्डासाठी किती गार्डन, शाळा, शौचालय, दवाखाने अशा प्रकारची नियमांप्रमाणे किती आरक्षणे ठेवावी लागतात व त्यासाठी खुल्या जागा किती व कुठे आहेत हे तपासावे व कोणकोणती आरक्षणे लादलेली आहेत हे समजून घ्यावे.
सध्याच्या असलेल्या आरक्षित जागांच्या जागा मालकांना घाबरून आरक्षणाच्या जागा कमी दरात घेऊन बिल्डरांच्या व विकासकांच्या घशात घालण्यासाठी आगाऊ आर्थिक तडजोड करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न मनसे जनतेला सोबत घेऊन हाणून पाडेल.
कणकवली शहराचा विकास आराखडा सुधारित होत असल्याने या संदर्भात ए. एल. यु. चार-पाच महिन्यांपूर्वी झाला हे बंडू हर्णे यांना माहीत नसणे हे तुमचे अज्ञान असल्याचे दया मेस्त्री यांचे म्हणणे आहे. या प्लान बाबत आपण सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचा माहिती नसणे हे अज्ञान असून साईडच्या नागरिकांना न कळवता साईड व्हीजिट झाली, त्याची माहिती नगरपालिकेच्या सभागृहात न देता त्यांनी परस्पर केली हे तुमचे अपयश व अज्ञान आहे. बंडू हर्णे यांनी सत्ताधारांचे मार्गदर्शन न घेता इतरांचे मार्गदर्शन घेऊन आपले विचार मांडणे योग्य नाही ते थांबवावे.
मनसे याबाबत फेरबैठक घेण्यासाठी मा जिल्हाधिकारी व नगरपंचायतीकडे मागणी करणार. वेळप्रसंगी अल्पावधीत लावलेल्या बैठकींची तक्रार करणार. शिवाय जनतेला आगाऊ सूचना देऊन प्रत्येक वॉर्डात आरक्षणाच्या जागेवर नेऊन विकास आराखडा दुरुस्त करण्यास भाग पाडणार, असे निवेदनाद्वारे मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मिस्त्री यांनी कळविले आहे.