You are currently viewing बांदा तपासणी नाक्यावर उभ्या कंटेनरला ट्रकची धडक; ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान

बांदा तपासणी नाक्यावर उभ्या कंटेनरला ट्रकची धडक; ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान

बांदा

गोव्यातून नगरच्या दिशेने लोखंडाची वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने वेळीच याठिकाणी तैनात असलेले पोलीस कर्मचारी बाजूला गेल्याने बचावले.

गोव्यातून नगरच्या दिशेने लोखंडाची वाहतूक करणारा ट्रक येत होता.बांदा पोलिसांच्या तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या पोलिसांकडून इतर वाहनांची तपासणी सुरू होती.याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने या कंटेनरने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली.त्यामुळे या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =