**जागतिक साकव्य विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.सविता पांडुरंग कुलकर्णी यांना नाशिक महानगरपालिकेचा “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार”.*
*जागतिक साकव्य विकास मंचचे प्रमुख श्री.पांडुरंग कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती*
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा सन २०२००-२३ शैक्षणिक वर्षासाठीचा “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” नवीन मराठी शाळा, नाशिक रोड, नाशिकच्या उपशिक्षिका, जागतिक साकव्य विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.सविता पांडुरंग कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. सदरचा पुरस्कार मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, शालिमार, नाशिक येथे प्रदान करण्यात येणार आहे.
सौ.सविता कुलकर्णी या जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच प्रमुख लेखक, कवी श्री.पांडुरंग कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती आहेत. सौ.सविता कुलकर्णी या विद्यार्थी प्रिय शिक्षिका असून त्यांच्या ज्ञानदानाच्या उत्तम सेवेसाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. जागतिक साकव्य विकास मंच आणि समाजातील विविध स्तरावरून सौ.सविता कुलकर्णी यांचे अभिनंदन केले जात आहे.