परफेक्ट अकॅडेमीच्या गुणवंत सत्कार सोहळ्यात आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन
नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये कुडाळ येथील परफेक्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. कुमारी दीक्षा सुमंत तोंडवळकर हिला 574 गुण मिळाले, तर कुमारी भक्ती सदानंद पाटील हिला 531 गुण मिळाले, तर सातारा जिल्ह्यातून खास नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या कु. रविराज रजागे याला 525 गुण मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहूनच नीट ची उत्कृष्ट तयारी करता येते हे या विद्यार्थ्यांनी आणि परफेक्ट अकॅडमी यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
या विद्यार्थ्यांसोबतच परफेक्टच्या अनेक विद्यार्थ्यांना 400 हून अधिक गुण मिळाले.
परफेक्ट अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये,नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कुडाळ मालवणचे आमदार श्री वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी बोलताना श्री वैभव नाईक यांनी विद्यार्थी तसेच पालक आणि विशेषता परफेक्ट अकॅडमी चे सर्वेसर्वा प्रा.राजाराम परब यांचे विशेष कौतुक केले. आमदार म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रवेश परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षा यामध्ये त्यामानाने मागासलेला जिल्हा होता,पण गेल्या काही वर्षांमध्ये परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील विद्यार्थी इथेच राहून घवघवीत यश मिळवत आहेत याचा आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान आहे. तसेच समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून श्री वैभव नाईक यांनी पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा उज्वल निकाल देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, तसेच तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि पूर्ण देशाचे भविष्य आहात या जबाबदारीने अभ्यास करा असे आवाहन देखील केले.
या कार्यक्रमाप्रसंगी परफेक्ट अकॅडमी चे चेअरमन प्राध्यापक राजाराम परब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री राजू राऊळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरस्कर, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉक्टर एम आर परब, परफेक्ट अकॅडमी चे शिक्षक तसेच कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते.