कुडाळ :
जागतिक भौतिकोपचार दिनानिमित्त बॅ. नाथ पै यांचे जनशताब्दी वर्ष व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय, कुडाळ यांच्या वतीने तसेच बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी मोफत भौतिकोपचार तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. सुरज शुक्ला (न्यूरो फिजीओथेरपीस्ट, प्रमाणित अॅक्वॅटिक फिजिओथेरपीस्ट), डॉ. प्रगती शेटकर मस्कुलोस्केलेटल आणि स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट), आणि डॉ. शरावती शेट्टी (फिजिओथेरपीस्ट) मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात मेंदू रक्तवाहिन्या आजार, स्नायूंचे व सांगाडा संबंधित आजार, हृदयविकार व फुफ्फुसांचे आजार, खेळ व फिटनेस तसेच कोविड आजारानंतर घ्यावयाची आरोग्याची काळजी त्या अनुषंगाने फिजीओथेरपी उपचार पद्धतीची आवश्यकता याचे मार्गदर्शन तसेच वरीलपैकी सगळ्या आजारांवर / त्रासांवर तपासणी व उपचार दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कुडाळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन कुडाळ, प्लॉट नं. 4, एमआयडीसी कुडाळ येथे उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच सोबत येताना जुने रिपोर्ट्स, आधारकार्ड व रेशनकार्ड आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 9799001257, 8147747593, 7208171190 संपर्क साधावा.