You are currently viewing उपळे गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी मनोज परब तर सचिवपदी प्रताप पालांडे यांची निवड

उपळे गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी मनोज परब तर सचिवपदी प्रताप पालांडे यांची निवड

वैभववाडी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर अखत्यारीत असलेल्या उपळे गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी मनोज परब यांची तर सचिवपदी प्रताप पालांडे यांची एकमताने निवड जाहीर झाली आहे. वैभववाडी तालुक्यातील
उपळे येथे पार पडलेल्या बैठकीत उपसमितीची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. मौजे उपळे गावचे देवस्थान श्री देव रवळनाथ, श्री देव गांगो व श्री देवी विठ्ठलादेवी मंदिर यांच्या व्यवस्थापन समितीची ही कार्यकारणी आहे. नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, अध्यक्ष मनोज रघुनाथ परब, सचिव प्रताप बाबुराव पालांडे, खजिनदार गोविंद गावडे, पुजारी सचिन पालांडे, सदस्य धनाजी हाडशी, शिवाजी हडशी, विजय जाधव, संतोष सकपाळ, अरविंद पालांडे,भिकाजी सुतार यांचा समावेश आहे.
या बैठकीला पंचायत समितीचे ग्राम विकास अधिकारी श्री. हांडे, वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस प्रतिनिधी, ग्रामसेवक, तसेच सरपंच तानाजी हडशी, माजी सरपंच देवानंद पालांडे, उपसरपंच श्री. नागले, माजी पोलीस पाटील श्रीधर पालांडे, श्रीमती अमरावती पालांडे, विनायक पालांडे, पपली पालांडे, ग्रा.पं. सदस्य रघुनाथ उपडे, सौ. नागले, स्वयंभू श्री देव सिद्धेश्वर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंत मांडवकर, सचिव शैलेंद्रकुमार परब आदी उपस्थित होते. तसेच मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते लहु पालांडे, विजय पालांडे, सोनबा पालांडे, सुरेश परब, केशव परब व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या उपसमितीची मुदत पाच वर्षे असणार आहे. देवालयाचे सर्व व्यवस्थापन या समितीच्या मार्फत पार पडणार आहे. नूतन कार्यकारिणीचे उपळे ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा