You are currently viewing वॉटर एटीएम मशीनच्या नावाखाली वेंगुर्लेत जनतेच्या पैशांचा चुराडा!

वॉटर एटीएम मशीनच्या नावाखाली वेंगुर्लेत जनतेच्या पैशांचा चुराडा!

 

वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत लाखो रुपये खर्च करून वेंगुर्ले शहरामध्ये शुद्ध पाण्यासाठी स्वच्छ भारत स्वच्छ जल अंतर्गत बसविण्यात आलेले वॉटर एटीएम मशीन काही दिवसातच बंद पडले आहेत. वॉटर एटीएम मशीनच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा चुराडा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड.मनीष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्राकाद्वारे केला आहे.

ॲड.मनीष सातार्डेकर
यांनी या पत्रकात म्हटले आहे, वेंगुर्लेवासीयांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने न.प. मार्फत बसविण्यात आलेल्या वॉटर एटीएममध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची शंका आहे. वॉटर एटीएम काही दिवसातच बंद पडले आहे. त्यामुळे वेंगुर्लेवासीयांना शुद्ध पाणी देण्याचा हेतूच ‘अशुद्ध’ झाल्याचा आरोप ॲड. सातार्डेकर यांनी केला आहे.

हे मशीन नेमके कोणाच्या फायद्यासाठी बसवले होते? वॉटर एटीएम ज्या कंपनीकडून खरेदी केले, त्यांच्यावर न.प. मार्फत काय कारवाई करण्यात आली? यासाठी लाखो रुपयांचा खर्च कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला? त्या प्रश्नांची उत्तरे वेंगुर्ले नगरपरिषदेने द्यावीत. यासाठी जबाबदार कंपनी, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सातार्डेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 9 =