You are currently viewing फोंडाघाट मध्ये विजेचा खेळ खंडोबा

फोंडाघाट मध्ये विजेचा खेळ खंडोबा

आमदार निलेश राणेंसह उद्या वीज वितरणला घेराव – सामाजिक कार्यकर्ते अर्जित नाडकर्णी

फोंडाघाट मध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या आजच्या पावसामुळे दुपारी २ वाजले पासुन लाईट गूल झाली आहे. त्यामुळे व्यापा-यांमध्ये तिव्र नाराजीचा स्वर उमटत आहे. आमदार नितेश राणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते उद्या फोंडाघाट मध्ये आल्यावर त्यांना घेवुन MSEB च्या अधिकाऱ्यांना व्यापारी घेराव घालणार आहेत. वीज वितरण च्या अधिकाऱ्यांवी संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल येत आहेत. त्यामुळे उद्या सरपंच आणि सर्व व्यापारी वीज वितरण च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार आहेत. फोंडाघाट मध्ये ३ ठिकाणातुन लाईन असताना ६/७ तास लाईट जातेच कशी? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी हे निवेदनाद्वारे विचारणार असून या गंभीर समस्या कडे आमदारांचे लक्ष वेधणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा