You are currently viewing १२ सप्टेंबरला होणारी सावंतवाडीची आमसभा रद्द…

१२ सप्टेंबरला होणारी सावंतवाडीची आमसभा रद्द…

सावंतवाडी

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत १२ सप्टेंबरला होणारी आमसभा रद्द करण्यात आली आहे. मंत्रालयीन कामकाज असल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचे सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.
यापूर्वी ही सभा ९ तारखेला आयोजित करण्यात आली होती. परंतु त्या दिवशी अनंत चतुर्दशी असल्यामुळे ती सभा पुढे घेण्यात यावी,अशी मागणी तालुक्यातून करण्यात आली होती. त्यानंतर १२ तारखेचे नियोजन करण्यात आले होते.
तब्बल सात वर्षांनी ही सभा होणार आहे.त्यामुळे अनेक विषयावर चर्चा होणार होती.परंतु मंत्रालयीन कामकाज असल्याचे कारण पुढे करून ही सभा आता पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र,सभेचाकालावधी किंवा तारीख अद्याप पर्यंत ठरवण्यात आलेला नाही.याबाबतची माहिती पंचायत समितीकडून प्रशासनाला देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा