कुडाळ :
“आनंद पूर्ण जीवन केवळ ज्ञान व विज्ञानाच्या आधारे शक्य आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांना नवीन आव्हाने पेरण्यास तयार केले पाहिजे आणि मानवी मनाचा सदुपयोग करण्यास तयार केले पाहिजे. शिक्षणाचा उपयोग रचनात्मक कार्य करणारे विद्यार्थी तयार करण्यासाठी झाला पाहिजे. असे विचार समाजाला देणारे थोर राष्ट्रपुरुष म्हणजे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन होय, असे उद्गार प्रा. अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त (शिक्षक दिनानिमित्त) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षणाबद्दल चे विचार व्यक्त करत- जे शिक्षण विद्यार्थ्यांना कठीण परिस्थिती विरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण करते ते खरे शिक्षण. कारण ज्ञान आपणास शक्ती देते आणि प्रेम परिपूर्णता देते. धनशक्ति और दक्षता केवळ जीवनाची साधने आहेत स्वतः जीवन नाही. याचा आपण विचार करून आनंद पूर्ण जीवन जगण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करावा, असे राधाकृष्णन यांचे विविध विचार त्यांनी उपस्थितांसमोर कथन केले. एक शिक्षक एक महान राष्ट्रपती होऊ शकतो. याची आठवण करत आपण शिक्षक असल्याचा अभिमान बाळगाला पाहिजे.असे सांगत शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनीच हा समाज घडविलेला आहे. याचं समाजाने भान ठेवलं पाहिजे. त्याचा आदर राखला पाहिजे, असे सांगत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे किरण करंदीकर, प्रसाद कानडे, पांडुरंग पाटकर, प्रा. प्रांजना पारकर, मिनल ठाकूर व कर्मचारी उपस्थित होते.