You are currently viewing 6 सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षांविषयी नि:शुल्क मार्गदर्शन

6 सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षांविषयी नि:शुल्क मार्गदर्शन

सावंतवाडी :

कोकणातील मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये आपला ठसा उमटवत प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर विराजमान व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या परुळेकर हॉल मध्ये मंगळवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता हे मार्गदर्शन शिबिर होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा भारत सरकारच्या सीमा शुल्क विभागातील कनिष्ठ अधिकारी, श्री. सत्यवान रेडकर हे यावेळी विविध उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

कोकणचा जर खऱ्या अर्थाने विकास व्हायला हवा असेल तर प्रशासकीय सेवेतील उच्च पदांवर मोठ्या प्रमाणात कोकणातील लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे. कोकणची भौगोलिक स्थिती आणि तेथील समस्या यांची योग्य जाण असणारा उच्च पदस्थ अधिकारीच कोकणच्या विकासासाठी हातभार लावू शकतो.

कोकण बोर्डात उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा शासकीय स्पर्धा परीक्षामध्ये उमटावा तसेच उच्च दर्जाचे अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी *तिमिरातून तेजाकडे* या उपक्रमाद्वारे विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे.

शैक्षणिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कळसुलकर हायस्कूलने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून आपल्या विद्यार्थ्यांनाही प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर विराजमान होता यावं यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

कोकणातील तरुणांनी व्यावसायिक बनावं आणि आर्थिक संपन्न व्हावं यासाठी विशेष अभियान राबवणाऱ्या अभिनव उद्योग प्रबोधिनीने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगदान दिलं आहे.

विद्यार्थी, पालकांनी आणि शिक्षकांनी या मार्गदर्शन सत्रचा अवश्य लाभ घ्यावा आणि प्रशासकीय सेवेतील विविध संधींची माहिती करून घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी 8767473919 या नंबर वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा