You are currently viewing गाबीत समाजाचे सक्रीय कार्यकर्ते प्रकाश बांदकर यांचे अल्पशा आजाराने निधन

गाबीत समाजाचे सक्रीय कार्यकर्ते प्रकाश बांदकर यांचे अल्पशा आजाराने निधन

देवगड

जामसंडे कट्टा येथील जेष्ठ नागरिक, कांजूरमार्ग गाबीत समाजाचे सर्वेसर्वा प्रकाश यशवंत बांदकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने आज दिनांक ५ सप्टेंबर २०२२ निधन झाले आहे. प्रकाश बांदकर हे कांजूरमार्ग गाबीत समाज संस्था स्थापनेपासून समाजासाठी मनाने, मनाने कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे लढवय्या कार्यकर्ता हरपला असल्याचे कांजूरमार्ग गाबीत समाजाचे अध्यक्ष गणेश फडके, महाराष्ट्र गाबीत समाजाचे अध्यक्ष सुजय धुरत, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर आदी समाज बांधवांनी दुःख व्यक्त केले आहे. बांदकर कांजूरमार्ग प्रेमनगर भागात होणाऱ्या उत्सवात सहभागी होत असत. ते लोभसवाणे आणि परोपकारी व्यक्तीमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुजन, दोन विवाहित मुलगी, मुलगे, जावई , सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने देवगड जामसंडे कट्टा व कांजूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मुत्यदेहावर मुंबई येथे हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा