*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंद ढवळीकर यांनी शिक्षक दिनानिमित्त लिहिलेलं अप्रतिम भारुड*
*भारूड*
( आली आली हो भागा बाई…या चाली वर )
त्यांनी पुस्तक आणा म्हटलं….आणली
त्यांनी वही आणा म्हटलं……..आणली
त्यांनी लेखणी आणा म्हटलं…..आणली
त्यांनी फी भरा म्हटलं………….भरली
पण शाळेत कांही तरी गडबड झाली….ग ड ब ड झाली
खडू फ़ळा आणी घन्टा ही दिसली….घन्टा दिसली
पण शिक्षक दिसलाच नाही….पण शिक्षक दिसला नाही
त्यानं शिकवणी लावून पाहिली…..शिकवणी लावून पाहिली
त्यानं शाळा बदलून पाहिली…..शाळा बदलून पाहिली
नुसती भाषणच ऐकून राही.. पण शिक्षक दिसलाच नाही
शिकून मोठा होईना वाटलं….मोठा होईन वाटलं
खूप पैसा मिळवीन वाटलं….पैसा मिळवीन वाटलं
पण किती खर्चले कळलंच नाही…कुठं शिक्षक दिसलाच नाही
बंगला घेतला गाडी घेतली…..बंगला घेतला गाडी घेतली
प्रपंच थाटला हौसही फिटली….हौसही फिटली
काय राहिलं तें कळलंच नाही..कुठं शिक्षक दिसलाच नाही
शिक्षक मिळणं सोपं नसतं….शिक्षक मिळणं ही सोपं नसतं
शिक्षक होणही सोपं नसतं..शिक्षक होणही सोपं नसतं
शाळा जन्माची सुटलीच नाही..कुठं शिक्षक दिसलाच नाही
सुख कशात समजून देतो….सुख कशात समजून देतो
समाधानाची पदवी देतो…..समाधानाची पदवी देतो
गुरु शिक्षक त्यातच पाही…त्या विना हो शिक्षक नाही
अरविंद