You are currently viewing उमेद अभियानाबाबत शासनाच्या निर्णयाचे अनंत पिळणकर यांनी केले स्वागत….

उमेद अभियानाबाबत शासनाच्या निर्णयाचे अनंत पिळणकर यांनी केले स्वागत….

कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

कणकवली

उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. राज्य शासन १०० कोटी रुपयांचे भागभांडवल देऊन उमेद बँकेचाही पाया घालत आहे. हा निर्णय म्हणजे महिलांच्या उत्कर्षाची नांदी आहे,  अशा भाषेत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाधयक्ष अनंत पिळणकर यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे राज्यभरातील चार हजारहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता. यामुळे सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कर्मचा-यानी एक दिवशीय धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाला अनंत पिळणकर यांनी भेट दिली होती. यावेळी आंदोलनकारी कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा पिळणकर यांच्याकडे मांडली. यावेळी आपण वरिष्ठ स्थरावर चर्चा करू असे आश्वासन पिळणकर यांनी दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सांगली येथे भेट घेतली आणि या अभियानातील कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या प्रयत्नालाही यश आले आहे.

दरम्यान राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असून शासनाने या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ दिलेला नाही. किंबहुना अन्याय होऊ नये अशी आपली मागणी होती. शासनाने या अभियानाच्या बाबतीत अत्यंत चांगला विचार केलेला असून आता या अभियानात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना आपण शुभेच्छा देत असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा  उपाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा