You are currently viewing गौर गणपती भोजन

गौर गणपती भोजन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी जी.आर.उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गौर गणपती भोजन*

भक्त देती तुझं आमंत्रण
ये गौराई करावे भोजन ।। धृ ।।

सडा रांगोळी दारी घातली
शुभ चिन्हानी पुलकित झाली
सजले अंगण बांधून तोरण
ये गौराई घ्यावे भोजन ।। 1 ।।

महिरपी तो मंडप सजला
मन्त्र उच्चारव गगनी भिडला
पंचपक्कवाने नैवेद्य मांडीला
फिटले पारणे धन्य ते लोचन
ये गौराई घ्यावे भोजन ।। 2 ।।

रौप्य जडीत तुझे आसन
भरजरी नेसवुन पित वसन
पक्कवाने ते ताट सजवून
संतुष्ट मनाने करावे ग्रहण
घे गौराई घ्यावे भोजन ।। 3
।।

सकळ कळांची माय गाथा
तुझ्या चरणी विनम्र माथा
सर्व सृष्टीची तूच त्राता
तुझ्या कृपेला करुनी वंदन
तृप्त होऊनी घ्यावे भोजन ।। 4 ।।

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
हरुगेरी
कॉपी राईट अष्टमी भाद्रपद

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − two =