सिंधुदुर्गनगरी :
सैनिक कल्याण विभागामार्फत शैक्षणिक वर्षे 2020-21 या वर्षासाठी माजी सैनिक व त्यांच्या विधवांचे पाल्य यांना इयत्ता 12 वी, डिप्लोमा, पदवी या परिक्षेमध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.
ही योजना बीई, बी टेक, बीडीएस, एमबीबीएस, बीएड, बीबीए, बीसीए, बीफार्म, एमबीए मॅनेजमेंट एमसीए, एकात्मिक कोर्सेस मध्ये बीए बीकॉम बीएससी अधिक एलएलबी, बीए बीकॉम बीएससी अधिक बीएड, बीए बीकॉम बीएससी अधिक एमबीए व बीए बीकॉम बीएससी अधिक स्पेशल या व्यवसायिक शिक्षणासाठी लागू करण्यात आली आहे. मात्र ही योजना मास्टर डीग्रीसाठी लागू करण्यात आलेली नाही.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी www.ksb.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने शनिवार दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्यात यावे. अधिक माहितीसाठी 02362-228820 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
0000