“आम्ही पोलिस म्हणून राजमुद्रा धारण करतो, तो आमचा अभिमान तर आहेच पण मोठी जबाबदारीही आहे. आमच्या या कामाला तुम्हा संविधान संवादकांचे काम पूरक ठरते आणि ते राष्ट्रीय कामच आहे.” असे विचार सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसेवा दल इचलकरंजीच्या कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील यांनी स्वागत केले. स्नेहल माळी यांनी प्रास्ताविकात ‘हर घर तिरंगा, हर घर संविधान’ सजावटीचे प्रयोजन सांगितले. तसेच पाहुण्यांना महामानवांचे विचारधन मालिकेतील पुस्तके भेट दिली. या सजावटीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी विकास अडसूळ यांनी उपस्थितांना संविधान प्रास्ताविका देवून कौतुक केले.
कोरो संस्थेची फेलोशिप मिळालेबद्दल अमोल पाटील, सौरभ पोवार आणि पुकार संस्थेची फेलोशिप रोहित दळवी आणि दामोदर कोळी यांना मिळाली आहे. त्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते संविधानाची प्रत देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संजय रेंदाळकर, सॅम आठवले, पत्रकार ऋषिकेश राऊत ,सतीश कवडे,सविता माळी आदी उपस्थित होते.