You are currently viewing कोरोनाचे संकट लवकर दुर होवो गणरायाच्या चरणी साकडे
कोरोनाचे संकट लवकर दुर होवो गणरायाच्या चरणी साकडे घालत पाच दिवसाच्या गणरायाचे विसर्जन उत्साहात

कोरोनाचे संकट लवकर दुर होवो गणरायाच्या चरणी साकडे

कोरोनाचे संकट लवकर दुर होवो गणरायाच्या चरणी साकडे घालत पाच दिवसाच्या गणरायाचे विसर्जन उत्साहात. . .

कुडाळ पिंगोळी येथे पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी गणेश भक्तांच्या संख्येवर असणाऱ्या मर्यादेचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करीत भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या”… अशा जयघोषासह “गो कोरोना गो”… अशा घोषणा देत कोरोनाचे संकट लवकर दुर होवो असे साकडे गणरायाच्या चरणी घालत मोठ्या उत्साहात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
यावर्षी कोरोना महामारी मुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले असल्याने गणेश भक्तांनी गर्दी न करता कमी संख्येच्या उपस्थितीने वाद्यांची साथ न घेता, फटाके न वाजवता साधेपणाने आपल्या घरी गणेश मूर्ती आणल्या होत्या. आज कुडाळात पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनही साध्या पद्धतीने करण्यात आले. कोरोनामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले असले तरी भाव भक्तीचा जागर कायम असल्याचे दिसून आले. मोजक्या संख्येने गणेश मूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडलेल्या गणेश भक्तांनी वाद्यांची साथ नसली तरी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जोरदार जयघोषासह गो कोरोना गो अशाही घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. सवाद्य मिरवणुकीला बंदी असल्याने काहींनी फटाके वाजवत विसर्जनात काहीशी रंगत आणली. गणेश भक्तांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करताना गणरायाची आरती करत विसर्जन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा