आरोसमध्ये बिबट्याची दुचाकीस्वाराला धडक

आरोसमध्ये बिबट्याची दुचाकीस्वाराला धडक

डोक्याला गंभीर दुखापत;  गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू

बांदा

चोहीबाजूने घनदाट जंगल असलेल्या आरोस गावात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोस गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक(45) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने मोठा अपघात झाला. दीपक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर गोवा बांबोळी रुग्णालयाच उपचार सुरू आहेत. भरवस्तीत बिबट्या फिरत असून वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. दीपक नाईक हे झोपेतून जाग आल्यानंतरही वाघ वाघ असे बोलत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा