You are currently viewing आंबोली घाटातील मृत महिलेच्या खुनाचा तपास….

आंबोली घाटातील मृत महिलेच्या खुनाचा तपास….

कोण हा खुफिया दोन तास?

मळगाव येथील मृत महिलेचा कोलगाव जंगलात शरीरसुख घेत असताना गळा दाबल्याने खून झाला होता. मृत महिलेचा मृतदेह आंबोली घाटातील दरीत फेकून विल्हेवाट लावली गेली होती. या प्रकरणात संशयित आरोपी योगेश आडणेकर, योगेश कांबळी, व नारायण गिरी सह दोघे अल्पवयीन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना तीन वेळा कोर्टात हजर केले गेले, तपासासाठी एकूण ११ दिवसांची पोलीस कोठडी देखील मिळाली होती. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. परंतु ११ दिवसांची पोलीस कोठडी मिळून देखील आरोपींना मोठ्या शिताफीने अटक करणाऱ्या सावंतवाडी पोलिसांना मृत महिलेच्या खूनासंदर्भातील सबळ पुरावे गोळा करता आले नाहीत. मृत महिलेची पर्स, चप्पल, मोबाईल, दागिने आदी वस्तू आरोपींकडून हस्तगत करता आले नाहीत. त्यामुळे संशयित आरोपींकडून वकीलपत्र दाखल केलेल्या वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरत आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित गोते आदींनी उत्तमरीत्या तपास करत आरोपींना गजाआड केले होते. परंतु संशयित आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे कुजलेल्या अवस्थेत आंबोली घाटाच्या दरीत मिळालेला मृतदेह हा बेपत्ता असणाऱ्या मळगाव येथील गीतांजली मळगावकर हिचाच आहे हे सिद्ध करण्याकरिता व्हिसेरा अहवाल आणि डीएनए चाचणी अहवालाची प्रतीक्षा करण्याखेरीज पर्याय नाही.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आरोप केला आहे की, सावंतवाडी पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी संशयित आरोपींना मदत करत आहेत. जर अशीच वस्तुस्थिती असेल तर संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता वाटत नाही. संशयित आरोपी हे अवैद्य दारू धंद्याशी निगडित असल्याने त्यांच्यावर अवैद्य दारू व्यावसायिकांचा अप्रत्यक्ष हात असणारच आणि संशयित आरोपी हे एका ड्रग्स विक्रेत्याकडून ड्रग्स विकत घेत होते त्यामुळे स्वतःची कातडी वाचविण्यासाठी हा खुफिया दोन तास नामक ड्रग्स विक्रेता संशयित आरोपींना वाट्टेल ती मदत करण्यास तयार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ड्रग्स विक्रेत्याने मोठ्यात मोठा वकील देऊन तुमच्या मुलाला आठ दिवसात सोडवून आणतो असेही एका संशयितांच्या घरच्यांना सांगितले आहे. त्यामुळे तपास होताना संशयित आरोपींच्या दारू कनेक्शन सहीत ड्रग्स कनेक्शनचा सुद्धा तपास व्हायला हवा.
एका महिलेवर अन्याय झाला असून आपली हवस भागविण्यासाठी तिचा गळा दाबून खून केला गेला असताना सावंतवाडीत नव्याने दाखल झालेल्या डीवायएसपी डॉ.सोळंके मॅडम यांच्याकडून मृत महिलेस न्याय मिळणे अपेक्षित आहे. नूतन डीवायएसपी मॅडम या एमबीबीएस असूनही पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. लॉकडाऊनच्या काळात आणि माजगाव येथील निलेश सावंत गळफास प्रकरणात आरोपींना गजाआड करणाऱ्या दबंग पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असणाऱ्या उपनिरीक्षक स्वाती यादव या देखील महिला अधिकारी आहेत. त्यामुळे मळगाव येथील मृत गीतांजली मळगावकर या महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात दोन्ही महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून देखील सावंतवाडीवासीयांना विशेष अपेक्षा आहेत.
अवैद्य दारूच्या धंद्यात गुरफटलेल्या तरुणांकडून मिळत असलेल्या बक्कळ पैशांच्या जोरावर अनैतिक दुष्कर्म केले गेले आहे. आणि भविष्यात असे दुष्कर्म करणारे आरोपी दारू व्यावसायिकांच्या जोरावर निर्दोष सुटले तर सावंतवाडी शहरातील इतर तरुणही अशी दुष्कर्म करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कसून तपास करून एका महिलेस खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोलीच्या दरीत फेकण्यासारखे कुकर्म करणाऱ्या संशयित आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल व्हावे अशी समस्त सावंतवाडीकरांची भावना आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − one =