You are currently viewing बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे उद्घाटन लवकरात लवकर करू – दीपक केसरकर

बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे उद्घाटन लवकरात लवकर करू – दीपक केसरकर

सावंतवाडी

सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारकरूपी पत्रकार भवनाचे उद्घाटन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, त्यासाठी आवश्यक असलेला निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास आज येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. दरम्यान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. श्री. नाईक यांचा वाढदिवस आज सावंतवाडीत हॉटेल मॅंगो मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव, हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, संतोष सावंत, अमोल टेंबकर, नरेंद्र देशपांडे, शुभम धुरी, महेश कुमठेकर, राजन पोकळे, नितीन वाळके, नंदू शिरोडकर, बाबू कुडतरकर, भाई देऊलकर, नंदू गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 20 =