You are currently viewing लावणी

लावणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लावणी*

*लावणी*

आवाज तुमचा दरबारीचा
नाचून मी दमले
सख्या तुम्ही बांध एक डोरले
।। धृ ।।

छबिदार मी छबी नृत्याची
फिदा झाले मी तव स्वरांची
शपथ घेतली लग्न गाठीची
तुमच्या स्वरात पाय थिरकले
राया तुम्ही बांधा एक डोरले ।। 1 ।।

कोरस – अहो दाजी तुम्ही बांधा की डोरले

रंग बिलोरी मीआरस्पानी
फुले कोवळी अंगी ज्वानी
मनात ठसली तुमची गाणी
ढोलकीचे बोल ते घुमले
सख्या तुम्ही बांधा एक डोरले
।। 2 ।।

बसा मंचकी देते मी विडा
इष्काचा त्यात कात केवडा
गोड गुलाबी कोड सोडा
एका नजरेत तुम्हा मी हेरले
सख्या तुम्ही बांधा एक डोरले
।। 3 ।।

श्रावण बरसे घनचिंब रात
रंगते मी तुमच्या गीतात
प्रेम घुंगरू बांधले पायात
तुमच्या स्वरावर भाळले
सख्या तुम्ही बांधा एक डोरले

प्रो डॉ जी आर प्रविण जोशी

अंकली जिल्हा बेळगाव
कॉपी राईट 23 ऑगस्ट 22
सर्व हक्क स्वाधीन

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − ten =