सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व मालवणचे बाळू अंधारी यांनी काँग्रेसचे गृहमंत्री तथा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री बंटी पाटील यांची सोमवारी भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस मजबूत करण्यासाठी एक दिलाने कार्यकर्ते काम करतील, पक्षांतर्गत मतभेद बाजूला करून पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने काम करू, असा विश्वास यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र उर्फ एम एम सावंत यांनी व्यक्त केला.
बंटी पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री आहेत. सिंधुदुर्गात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येण्याचे मान्य करून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.