You are currently viewing डॉ व्ही व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल शिरपूर येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप

डॉ व्ही व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल शिरपूर येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप

शिरपूर – किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचालित डॉ.व्ही. व्ही. रंधे इंग्लिश मिडियम स्कूल, शिरपूर येथे ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ निमीत्त जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शाळेचे समन्वयक श्री.जी. व्ही. पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.प्रमोद पाटील, प्राचार्य कामिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जंत नाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जी. व्ही. पाटील यांनी जंतापासून मुले कशी मुक्त होऊन सशक्त राहतील, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जंतनाशक गोळी वाटपप्रसंगी सारिका ततार, मनीषा पाटील, वंदना पाटकरी, छाया पाटील, सुरेखा चौधरी ,समाधान राजपूत, वंदना पांडे, तनुजा पाटील, सविता गिरासे, ममता पाटील यांच्या हस्ते जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तर सूत्रसंचालन शगुफ्ता पिंजारी व आभार उमेश राजपूत यांनी मानले.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा