You are currently viewing कणकवली येथे खासदार विनायक राऊत यांनी घेतले श्री श्री वामनाश्रम स्वामींचे दर्शन

कणकवली येथे खासदार विनायक राऊत यांनी घेतले श्री श्री वामनाश्रम स्वामींचे दर्शन

कणकवली :

 

कणकवली येथे श्री संस्थान काशी तथा हळदीपुर मठाधीपदी श्री श्री वामनाश्रम महास्वामी सध्या १९ व्या चातुर्मास सोहळ्यानिमित्त वास्तव्यास आहेत. याचे औचित्य साधुन शिवसेना सचिव खासदार श्री.विनायक राऊत यांनी आज या सोहळ्यास उपस्थित राहून श्री श्री वामनाश्रम महास्वामींचे दर्शन घेवुन आशिर्वाद घेतले. यावेळी स्वामींनी श्री.विनायक राऊत यांचा शाल व प्रतिमा देवुन सत्कार केला.

यावेळी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना युवानेते संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, शंकर पार्सेकर, अँड.हर्षद गावडे, सचिन सावंत, बंडू ठाकुर, उमेश वाळके, अँड.दिपक अंधारी, दादा कुडतरकर, सोहम वाळके, राजु पावसकर, बंड्या कोरगावकर, बाबु केनी, पप्या राऊत, मनीष राऊत यांनी देखील उपस्थित राहुन स्वामींचे दर्शन घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 2 =