You are currently viewing प्रेमसंबंध नाकारल्याच्या रागातूनच सायलीचा खून

प्रेमसंबंध नाकारल्याच्या रागातूनच सायलीचा खून

मैत्रिणीचा पतीच निघाला आरोपी

वेंगुर्ले

मठ कणकेवाडी येथील सायली यशवंत गावडे (२०) ही २७ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती. या संदर्भात दिनांक 2८ रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. रविवारी रात्री आडेली येथील एका बागेत सायली हिचा मृतदेह डोक्याच्या मागे जखम, चेहर्‍यावर जखमा आणि गळयाभोवती काळा व्रण अशा अवस्थेत आढळून आला.

राजन नार्वेकर याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस साडेअकरा वाजता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मृतावस्थेतील सायलीचा तिच्याच ओढणीच्या साह्याने गळा आवळून तसेच तिच्या नाका तोंडावर आघात करून तिचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याबाबत सायलीच्या मैत्रिणीचा पती गोविंद उर्फ वैभव दाजी माधव (रा. परूळे, वय ३०) याच्यावर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ चा गुन्हा दाखल केलेला आहे.

याप्रकरणी अन्य तिघाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, ओरोस येथील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घाग यासह पुन्हा अन्वेषण शाखेची टीम करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =