नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
कणकवली
कोरोना काळात अहोरात्र १०८ च्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून सेवा देणाऱ्या २८ चालकांचा कणकवली नगरपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात येत असतानाच, यांच्या सोबत कणकवली शहरात कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या ३० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सत्कार कणकवली नगरपंचायत च्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे.
कोरोना सारख्या महामारीच्या कठीण काळात कणकवली शहरात या ३० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने सेवा देत शहरात कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या औषधोपचार व अन्य सुविधेसाठी केलेल्या मदतीमुळे हे आरोग्य कर्मचारीही खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या या सेवेची दखल नगरपंचायत घेतली असून, १५ ऑक्टोबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत मध्ये या सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा होणार आहे, अशी माहिती श्री. नलावडे यांनी दिली. रुग्णवाहिका चालक व आरोग्य कर्मचारी यांचा एकत्रित सत्कार करण्यात येणार असल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले.