You are currently viewing “एम्.आय्.डि.सी.असो.च्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना. एन्. एच्. ६६ महामार्गाबाबत निवेदन….

“एम्.आय्.डि.सी.असो.च्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना. एन्. एच्. ६६ महामार्गाबाबत निवेदन….

महामार्ग एन्. एच्. ६६ ते कुडाळ औद्योगिक वसाहत व्हाया चीनी विमानतळ रस्त्यावरील चौकाचे रुंदीकरण करण्यासाठी एम्. आय्. डि. सी. असो. कुडाळच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केली. असो. अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर, कार्यवाह अॅड नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, माजी अध्यक्ष श्री आनंद बांदिवडेकर, सहकार्यवाह श्री कुणाल ओरसकर, सदस्य श्री राजन नाईक, श्री मुश्ताक शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग एन्. एच्. ६६ वरुन कुडाळ कुडाळ एम्. आय्. डि. सी. व्हाया सिंधुदुर्ग विमानतळ प्रवेश करण्यासाठी आवश्यक वळण हाॅटेल आर्. एस. एन्. या चौकातून घेणे धोकादायक असून या चौकातील रुंदीकरण करणे आवश्यक आहे. जर हे रुंदीकरण केले तर एम्. आय. डी. सी च्या दिशेने जाणाऱ्या अवजड वहानाना फार सोपे जाईल. भविष्यात वाढत चाललेली औद्योगिक वसाहत, मोठ्या उद्योगांची अपेक्षा व विमानतळाकडे पिंगुळी मार्ग वगळून एम्. आय्. डिसीकडे जाणारा सुकर मार्ग उपलब्ध झाल्यास वहातुक सुलभ होवू शकते. मा. मञीमहोदयानी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 18 =