प्रवासी संघाने सुरु केलेला उपक्रम कौतुकास्पद
कणकवली
लवकर निघा, सावकाश या आणि सुरक्षित पोहचा आणि काळजी घ्या, हा संदेश चाकरमान्यांच्या काळजी पोटीचा आहे. याच भावनेतून कणकवली तालुका प्रवासी संघाने सुरु केलेला हा उपक्रम निश्चितपणे कौतुकास्पद असून यामध्ये ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने त्यांचे हे आशीर्वाद चाकरमान्यांच्या उज्ज्वलमय भवितव्यासाठी निश्चितपणे कामी येईली. अशा स्तुत्य उपक्रमांच्या पाठिशी यापुढे नगरपंचायत प्रशासन खंबीरपणे राहील, असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.
कणकवली तालुका प्रवासी संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलीस यंत्रणा व महसूल विभाग आणि विद्यामंदिर प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने गौरीगणपती येणान्या चाकरमान्यांचा स्वागत कार्यक्रम येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात आयोजित केला होता. या प्रसंगी समीर नलावडे बोलत होते. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, कणकवली आगाराचे व्यवस्थापक प मोद यादव, तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, दादा कुडतरकर, अशोक करंबेळकर, रवींद्र मुसळे, रमेश जोगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार आर. जे. पवार यांनी प्रवाशांनी गाडीचा वेग, रस्त्याची बाजू सोबत कागदपत्रे व अनावश्यक मोबाईलवर बोलणे, नशापाणी न करता गाडी चालवणे याबाबत मार्गदर्शन केले. कोणाचाही दुर्देवी अपघात झाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो, याचे भान वाहन चालकाने ठेवून प्रवाशांचा प -वास सुखकर कसा होईल, याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी दादा कुडतरकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर मनोहर पालयेकर यांनी कणकवली तालुका प्रवासी संघाची उद्दिष्ट ध्येये व इतर उपक्रमांबद्दल माहिती उपस्थितांना दिली. रेल्वे, एसटी, खासगी बसेस, रिक्षा टेम्पो आदी वाहनांच्याबाबत तक्रारी बजा सूचना असल्यास प्रवाशांनी (९४२१२३५५८९) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
चाकरमान्यांचे गुलाबपुष्प, चॉकटेल देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी येणाच्या वाहनांवर प्रबोधनात्मक स्टिकर लावण्यात आले. सूत्रसंचालन रवींद्र मुसळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यापारी निवृत्ती धडाम, डॉ. विठ्ठल गाड, सुभाष राणे, अनिल परब, योगेश मुंज, प्रा. जे. जे. शेळके, भालचंद्र मराठे, राजाराम परब, श्रद्धा कदम, अॅड. संदीप राणे, बाळा वाळके, महानंदा चव्हाण, दादा कोरडे आदीसह विद्यामंदिरच्या स्काऊंड गाईडच्या विद्यार्थ्याच्या समावेश होता.