You are currently viewing देवगड एसटी स्टँड ते खाकशी तिठा दुपदरी व सिमेंट काँक्रीट तर मांजरेकर नाका ते तारामुंबरी रुंदीकरण….

देवगड एसटी स्टँड ते खाकशी तिठा दुपदरी व सिमेंट काँक्रीट तर मांजरेकर नाका ते तारामुंबरी रुंदीकरण….

नगरसेविका तन्वी योगेश चांदोक्सर यांचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन

देवगड

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगड बस स्थानक ते खाकशी तिठा हा राज्य महामार्ग दुपदरी व सिमेंट काँक्रीट करण्यात यावा तसेच श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर ते मिठमुंबरी देवगड, मांजरेकर नाका ते तारांमुबरी रस्ता सात मीटर रुंदीकरण करण्यात यावा,देवगड निपाणी मार्गावर वाढते अपघात रोखण्यासाठी आवश्य ठिकाणी गतिरोधक घालण्यात यावा यासाठी निधी उपलब्ध करून मिळावा
याबाबतची मागणी लेखी निवेदनाद्वारे देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेविका तन्वी योगेश चांदोस्कर यांनी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली आहे, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भेट घेऊन नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे, संबंधित रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करून देऊ असे आश्वासन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांना दिले आहे,

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − seven =