दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डॉ. प्रेरणा राणे फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळणार नावनोंदणीचे आवााहन..

वैभववाडी :

डॉ. प्रेरणा राणे फाऊंडेशन तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.२०२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या विध्यर्थांनी आपली नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. प्रेरणा राणे फाऊंडेशन गेली दहा वर्षे वेंगुर्ला तालुक्यातील विद्यार्थी व शाळांबरोबर कार्यरत आहे. हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते व पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात. आत्तापर्यंत फक्त वेंगुर्ला तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे. डॉ. प्रेरणा राणे फाऊंडेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवित आहे. ही शिष्यवृत्ती वार्षिक उत्पन्न रु. २ लाख पेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्याने २०२० मध्ये एस. एस. सी. परीक्षा 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी किंवा एच. एच. सी. परीक्षा 80% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. पात्र विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या ई मेल पत्त्यावर गुणपत्रिका व उत्पन्नाचा दाखला पाठवावा. त्यानंतर त्यांना ईमेलने अर्जाचा नमुना पाठविण्यात येईल. भरलेले अर्ज 30 ऑक्टोंबर 2020 पर्यंत स्वीकारण्यात येतील.अशी माहिती डॉ. ललिता देशपांडे यांनी दिली आहे.

lalita.deshpande169@gmail.com, अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 9821453959/ 9075972353 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 13 =