राज्यपाल भगतसिंग कोश्यारी २७ ऑगस्टला एक दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. तळेरे येथे कॉलेजचे उद्घाटन व वेंगुर्ला येथे मरीन केंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी यांनी संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेत दौऱ्याचे चोख नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी २७ ऑगस्टला सकाळी १०.१५ ला चीपी विमानतळ येथे आगमन तेथून कारने तळेरेकडे प्रयाण व ११.३५ ते १२.२५ तळेरे येथील व्ही .व्ही .कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, त्यानंतर कारने वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राकडे प्रयाण व २ वाजता आगमन तेथे सौरभ गेस्टहाऊसला २ ते ३ राखीव, नंतर वेंगुर्ला नगरपालिका क्षेत्रातील मरीन केंद्राच्या उद्घाटनास ३.३० ते ४.१० ला उपस्थिती, त्यानंतर चिपी विमानतळाकडे प्रयाण.
व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर कणकवली प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तळेरे येथे जाऊन कॉलेजची पाहणी केली. तर सावंतवाडी प्रांताधिकारी व वेंगुर्ला तहसीलदार यांनी वेंगुर्ला जागेची पाहणी केली.