पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि 10 जून 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            गुरुवार दि. 10 जून रोजी दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात आढावा बैठक, दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य अतिवृष्टीबाबत आढाबा बैठक, दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, दुपारी 3.30 वा. मंत्रिमंडळ बैठकीस ऑनलाईन उपस्थिती, सायं. 5 वा. मोटारीने ओरोस – सिंधुदुर्ग येथून राजापूर, रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा