*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित लघुकथा*
*’परतफेड’*
रोड क्रॉस करतं असताना वसुधाचा अपघात झाला तिला जबरदस्त दुखापत झाली होती जवळपासच्या लोकांनी तिला उचलून बाजुला नेले,बराच वेळ तिची विचारपूस करण्यातच गेला त्यामुळे ती बेशुद्धझाली आणि पोलीसही आपल्या नेहमीच्या वेळेत आगदी फुरसतीत येवून पुढील कारवाईस सुरूवात केली.त्यावेळी त्या गर्दीत सुधीरही तिथेच उभा होता.जरा डोकावून पाहिल्यावर वसुधाला पाहिल्यावर त्याला धक्काच बसला.त्यावेळी वसुधाला अपेक्षीत अशी मदत हवी असतानाही कोणाकडूनही मदत मिळत नव्हती.अशात पोलीसनी पंचनामा केला आणि नाईलाजास्त वसुधाला ओळखत असल्याचा कबुलीजबाब सुधीरकडून पोलीसांनी नोंदवून घेतला.त्यानंतर सारे सोपस्कार आटोपल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये रवाना केले.खरतर वसुधाला पाहिल्यावर सुधीरला अजीबात मदत करण्याची ईच्छा नव्हती,पण हा अनपेक्षित योगायोग समजावा की सुधीर त्यावेळी तिथे उपस्थित होता म्हणून त्याच्यावर अशी मदत करण्याची वेळ आली.शेवटी नातं असो अथवा नसो माणुसकी या नात्याने मदत कराविशी वाटली म्हणून सुधीरने पुढाकार घेतला.माणुसकीला महत्व देवून सुधीरने सेवा हॉटेलमध्ये कार्यरत असलेली मैत्रीण डॉ नम्रताला फोन करून सविस्तर खुलासा दिल्यानंतर तिच्यावर उपचार करायला सुरूवात झाली.अपघात ईतका गंभीर होता की तिच्यावर उपचार करणे तर अवघड होतेचं व खर्चही खूप योणार होता, शिवाय कोम्यात गेल्यामुळे ती वाचेल की नाही याची शास्वती फार कमी होती.प्राथमिक उपाचार सुरू केल्यानंतर पुढील उपचाराच काय?पुढील उपचार करण्यासाठी तिच्या मोबाईलवरून तिचे आईवडील व ईतर नातेवाईकांना फोन करून तिचा अपघात झाल्याच सांगितले असता.’तिचा आता आमच्याशी काहीएक संबध राहीला नाही. ती मेली तरी आम्हाला कळवू नका असे उत्तर मिळाल्यावर डॉक्टरांसमोर मोठे संकट उभे राहीले.नातेवाईकांनी नकार दिला म्हणून वसुधाला वाऱ्यावर सोडून देणे हे डॉक्टर या नात्याने नम्रताला योग्य वाटत नव्हते.शासकीय योजनेतून तिच्या उपचारावर निम्मा खर्च करता येत होता.पण तिच्या ऑपरेशनवर व पुढील होणारा खर्ची आणि तिच्या जबाबदारीच कायं?तिच्या घरच्यांनी नकार दिल्यामुळे तिच्या देखभालीचा प्रश्नचिंन्ह नम्रताच्या अवतीभवती घुटमळत होते.या बाबतीत डॉ.नम्रताने सुधीरशी सविस्तरपणे चर्चा केल्यानंतर तिच्या खर्चाची जबाबदारी घेवून तिला वाचवण्याची सुधीरने केलेली विनंती स्विकारुन डॉ नम्रतानेही वसुधाची काळजी घेण्याच आश्वासन दिले आणि वसुधावर उपचाराला सुरूवात झाली.त्यानंतर महिनाभर सुधीर डॉ नम्रताच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घ्यायचा.
सुधीर एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठा अधीकार होता तिथे पैशाला काही कमी नव्हती,पण सुधीरने घेतलेला निर्णय नम्रताला मान्य नव्हता शिवाय सुधीरचे आईवडिलही मुळीच सहमत नव्हते,पण वसुधाच्या आई वडिलांनी तिच्या उपचारची जबाबदारी स्विकारली नाही म्हणून तिला मरायला सोडून देणेही सुधीरला योग्य वाटतं नव्हते.तिचे नातेवाईक असते तर ‘आ बैल मुझे मार’ अशी वेळ सुधीरवर आली नसती,पण हा नियतीने मांडलेला डाव होता म्हणून सुधीरही जास्त खोलात न जाता माणुसकी या नात्याने स्वतःहूनच संकट ओढवून घेतले.खरतर सुधीर खूपच हळव्या मनाचा माणूस,त्याला कोणाच्याही वेदना,दुःख बघवले जातं नव्हते,मग ते आपले असो वा कोणी परके मागचा पुढचा विचार न करता मदतीला पुढेच.भावनांचा विचार करणारा माणूस दुसऱ्यांच्या डोळात आलेले अश्रु बघू शकतं नाही,सुधीरच्या बाबतीतही असच होतं म्हणून वसुधाला वाऱ्यावर सोडून पळ काढणे त्याला योग्य वाटले नाही.जे व्हायच ते होईलच पण वसुधाला मरणाच्या दारातून बाहेर काढून तिला आयुष्य मिळावे हाच एक सुधीरचा प्रामाणिक हेतू होत.सुधीरच्या आयुष्यात ज्याच्या काही चांगल्या वाईट घडामोडी घडल्यात याची साक्षीदार डॉ.नम्रता होती आणि अस असतानाही मनात कसलाच किंतू परंतु न ठेवता सुधीरने वसुधाच्या उपचारावर खर्च करावेत याचे नम्रताला आश्चर्य वाटतं होते.मनावर आधीच इतके ओरखडे असतानांही चुकीच्या व्येक्तीवर उपकार होत होते. दुःख पचवून स्वतःहून मदतीचा हात पुढे करणारी देवमाणसं जगातं आहेत याचं उदाहरण म्हणजे सुधीर.
वसुधाच्या आयुष्यची दोरी बळकटं होती म्हणून सुधीरच्या निमित्तानेका होईना वसुधाला जिवदान मिळाले.नाहीतर अवघड ऑपरेशन त्यात कोम्यातून बरे होणे शक्य नव्हते,अर्थात वेळ होती पण काळ नव्हता असेच म्हणावे लागेल.आणखी एक आठवडा वसुधाला हॉस्पिटलमध्ये थांबाव लागणार होतं तशी नम्रताही वसुधाची चांगली मैत्रीण होती,अपघातानंतर रूग्णालयात कशी आली,कोणी पोहचवले,यावर नम्रता आणि वसुधा यांच्यात दिर्घचर्चा झाली.सुधीर होता म्हणून उपचार होवू शकलेत,नातेवाईकांनीही नकार देवून असमर्थता दाखवली आणि सुधीरने पुढाकार घेतल्यामुळे जीव वाचल्याच ऐकून वसुधाच्या पायाखाली जमीनच निसटली,तिला जबरदस्त धक्का पोहचला,नम्रताला घट्ट मिठी मारून वसुधाने खूप रडून घेतले.काय करावं,रडावं की वेडं व्हावं,क्षमा कशी मागावी, कसे आभार मानावेत काहीच कळतं नव्हते पश्चतापाच्या आगीत अस्वस्थ वाटत होते.
पश्चतापाच्या आगीत जीवाची घालमेल,मनाची आग,भावनांची राख झालेलीच होती.पण आपण काय केलेत आणि आपल्यासोबत काय झाले ही अवस्था वसुधाला स्वस्थ बसुदेत नव्हती.आता जे झाले ते आठवून उपयोग नव्हता किंबहूना पश्चताप करण्यातही काही अर्थ नव्हता.
परिस्थिती एका जागी थांबून रहात नाही,कालांतराने बदल होतोचं त्यासाठी वाट बघावी लागते,आणि प्रतिकूल परिस्थितीत बायकोची नवऱ्याला साथ नसेल तर अशा नात्याला काय अर्थ.नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाके एक चाक थांबल की दुसरे चाक पुढे चालते,संसार दोघांचा असतो दोघी मिळून करायचा असतो.आहे त्या परिस्थितीत नवऱ्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला पुढे नेणारी बायको म्हणजेच नवऱ्याची खरी अर्धांगिनी असते.पण स्वतःच्या हौसेखातर उगाच नवऱ्याला त्रास देवून त्याचा छळ करून त्याला अर्ध्यातून सोडून जाणाऱ्या बाईला कुठेच स्थान नसते तिच्या आयुष्याची वरात वाऱ्यवरच असते वसुधाच्या बाबतीत अशीच घटना घडून गेली म्हणून नियतीने तिला अशी शिक्षा दिली.पण तिने ज्याची साथ सोडून निघून गेली त्याच सुधीरमुळे तिचा जिव वाचला.हो वसुधा म्हणजे सुधीरची पूर्वाश्रमीची बायको! जी सुधीरच्या हलाखीची परिस्थितीत साथ न देता सोडून गेली सुधीर सोबत तिला तिच्या मनासारखे जगता येत नव्हते,हिरता येत नव्हते फिरता येतं नव्हते कुठलीच हौसमौज करता येत नव्हती तिच्या कुठल्याच ईच्छा पुर्ण होत नव्हत्या म्हणून छळकपट करून ती सुधीरपासून विभक्त झाली.प्रतिकूल परिस्थितीत घराला घरपण नाही देता आले एकमेकांना आधार नाही देता आला तर अशा जगण्याला अर्थ नाही. समजून घेतले तर सर्व अडचणी दुर होतात पण मनासारखे जगता येत नाही म्हणून नवऱ्या पासुन वेगळे होणे म्हणजे तो स्वतःहून स्विकारलेला पराभव समजावा आणि असा पराभव वसुधाने स्वतःहून स्विकारला म्हणून तिच्यावर अशी वाईट वेळ आली होती.
अपघात झाला त्यावेळी सुधीरने त्या ठिकाणाहून निघून जायला हवे होते पण त्याने तसे केले नाही.ती कशीही वागली असेल तरी त्यावेळी तिला पाहून
सुधीरला गहीवरून आलेनी् त्याच्यातली माणुसकी जागी झाली तो वसुधाला सोडून जावू शकला नाही. दवाखान्यात नेताना वसुधाने दिलेला त्रास आठवत होता पण सुधीरने समजूतदारीने घेतले.आज जरी कठीण परिस्थिती असली तरी उद्याचा दिवस सुखाचा असणार आहे असे वारंवार सांगुनही वसुधाने सुधीर सोबतचा दहा वर्षाचा संसार एकाक्षणात मोडून सुधीरला सोडून गेली. कुटुंबाशी वसुधाला जुळवून घेता आले नाही,श्रीमंत होताण्याची तिला खूप घाई झाली होती.आता कष्टाने, मेहनतीने सुधीरला सारे सुख,वैभव मिळाले एशोआरामाची जिंदगी त्याच्य वटेला आली कशाला काहीच कमी नाही.काळ बदलला आणि वेळेने त्याला श्रीमंती दिली पण त्या श्रीमंतीत वसुधा नव्हती थांबली असती तर सुख समृद्धीच्या वैभवात ती न्हाऊन निघाली असती पण काय असते की कधी कधी काही अडथळे दुर झाल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाहीत. नशिबात होते पण वसुधाला घेता आले नाही.नवराबायकोचं नातं सुईदोऱ्या सारखे असते काहीही झाले तरी सुटतं नाही आणि तुटतही नाही आणि अस व्हायलाही नको.मनासारखे स्वप्नरंजीत,सैरभैर सुखासाठी सुधीरला सोडून वसुधाने दुसरा घरोबा केला.पण ती ज्या अपेक्षेने दुसऱ्यावरोबर संसार थाटला तिथे तिच्या अपेक्षाभंग झाल्यात,मनासारखे सैरभैर जगता येईल असे तिला वाटले होते पण दुसऱ्या नवऱ्या कडून प्रेम तर जावूचद्या साधे सुखाचे बोलही तिला मिळत नव्हते,वेदना, यातना,दुःख,मारझोड, याच्याशिवाय तिच्या वाटेला काहीच नव्हते. रोज मारखायचा रोज बरेवाईट बोल एकायचे असेच जगणे तिच्या वाटेला आले होते. त्यापेक्षा सुधीरचा संसार काय वाईट होता छोटं विश्व होत पण त्यात खुप सुख होत.कदाची सुधीरचा सहवास त्यावेळी तिला आठवतही असेल पण तिने घेतलेला चुकीचा निर्णय तिलाच महागात पडला.सुधीर सारख्या चांगल्या,सभ्य देवमाणसाला सोडून दिल्यामुळे वसुधाचे आईवडल व ईतर नातेवाईकांनी तिच्याशी कायमचे नाते तोडले त्यामुळे दुसऱ्या नवऱ्यापासुन होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने त्यालाही सोडले.आणि वसुधावर एकाकी जगण्याची वेळ आली.
चुकीचे वागलात किंवा काहि चुकीचे काम केले तर याला क्षमा नसते. वेळकाळ त्याला शिक्षा देतेच सुटका नाहीच म्हणजे नियती नियमा नुसार हा अपघात घडुन आला आणि सुधरीच्या मदतीने वसुधाचा जीव वाचला.वसुधाचे जीवंत असणे हिच तिच्यासाठी फार मोठी शिक्षा होती. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे की पाप करणाऱ्या माफ करावे,माफी हिच त्याच्यासाठी शिक्षा असते.घरात सर्व सुख सौख्य नादंत असताना पुन्हा दुसरी वसुधा नको म्हणून सुधीरने दुसरे लग्न केलेच नाही.जे भोगले त्याच्यासाठी ते भयंकरच होते पण सर्वच वसुधा काही सारख्या नसतात,कोणीतरी प्रेम करणारी प्रेमळ व्यक्ती असतेच,पण नाही आता जे काही करायच ते सावधपवित्रा घेवूनच उगाच उतावीळ होवून गुढग्यावर बाशिंग बाधायचं नाही म्हणून सुधीर त्याच्या निर्णयावर ठाम होता.जे झाल ते आठवताना एकदा भेट घ्यावी म्हणून डॉ.नम्रता कडून मिळालेला वसुधाचा निरोप सुधीरने
नाकारला,का वाचवले मरू दिले असते वसुधाच्या या प्रश्राला सुधीर जवळ उत्तर नव्हते,’कदाचीत काही देणे बाकी असावे म्हणून परमेश्वराने अशाप्रकारे परतफेड करून घेतली,तिने दिलेले घाव भरले नसतानाही माझ्या हातून असकाही घडून येईल याचा कधी मी विचारही केला नव्हता जे झाल ते योग्य होते की अयोग्य होते ते देवालाच माहीत पण वसुधाने दिलेल्या जखमांची ही केलेली छोटीशी मदतीची भेट होती’ एव्हढा सांगुन हॉस्पिटलचे दोन लाखाचे बिलभरून सुधीरने नम्रताचा निरोप घेतला.
*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८